Monsoon Update | यंदा पावसाने महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले आहे. तिकडे नद्या पात्र सोडून वाव लागले आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं हात तोंडाची आलेलं पीक पाण्यात गेले आहे. अन्न पाणी, विज, सगळं काही उध्वस्त झाले आहे आणि जरा पावसाना विश्रांती घेतली असं वाटतंय तर तोवरच आता नवीन संकट आले आहे.Monsoon Update
हवामान विभागाचा इशारा, कोकण किनारपट्टी धोक्यात !
भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ आकार घेत आहे. हे वादळ पुढील 48 तासामध्ये आणखीन तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि मुंबईचा संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हवामान विभागाचा अलर्ट जारी केला आहे.
सध्यातरी किनाऱ्यावर वादळाचा थेट परिणाम दिसत नसला तरी समुद्राच्या पाण्यात हालचाल सुरू आहे. खोल समुद्रात वाऱ्यांचा वेग ताशी 50 किमी पर्यंत पोहोचतोय. हे वादळ पश्चिम किनारपट्टीकडे सरकत असल्यामुळे पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत.
राज्य पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार !
चक्रीवादळामुळे रजत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आणि विदर्भात मेघ गर्जनाचा विजेच्या कडकडे बरोबरपाऊस दिसणार आहे .
शेतकऱ्याचे नुकसान थांबायचं नाव घेईना !
आधीच अधिवृष्टीमुळे शेतातलं सगळं पाण्याखाली गेला आहे. आता पुन्हा पावसाचा मारा आणि वादळाचा धोका त्यामुळे उरलेली थोडीफार उभ्या पिकाची आशा देखील मावळताना दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी नुकतीच रब्बी हंगामाची तयारी सुरू केली होती पण आता शक्ती चक्रीवादळाच्या भीतीने सर्व शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी समुद्रात जाणं थांबवले. पहिल्यांदीच मच्छीमारांची व्यवसाय मंदावली आहे, आणि आता पुन्हा एक मोठा धक्का. हवामान खात्यांना मच्छीमारांना पुढील दोन ते तीन दिवस समुद्रात जाणं टाळा असा स्पष्ट आलेला आहे.
हे पण वाचा | पंजाबराव डख यांचा 2025 चा पावसाळी अंदाज: यंदाचा पाऊस देईल का शेतकऱ्यांच्या आशांना जीव?