New Gold Price: सोन्याच्या किमतीत तब्बल 32,800 रुपयाची वाढ; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Gold Price: अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सारखा मोठा सण येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त अनेक घरांमध्ये सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र यंदा सोन्याच्या किमती ज्याप्रमाणे गगनाला भिडत आहेत. ते पाहून अनेक जणांसाठी सोने खरेदी करणे अशक्य झाले आहे. कारण सोना आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झाली आहे. अनेक जण दिवाळीच्या सणानिमित्त दागिने खरेदी करत असतात. मात्र यावर्षी सोन्याच्या किमतीत झालेली वाढ पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित झाले आहेत. मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत.

24 कॅरेट सोन्याचा दर

आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. 24 कॅरेट 10 तोळा सोन्याचा दर तब्बल 32,800 रुपयांनी वाढून 12,86,800 रुपये एवढा झाला आहे. म्हणजेच केवळ एका दिवसात सोने जवळपास 33 हजार रुपयांनी महाग झाले आहे. आज 24 कॅरेट प्रति 10 ग्राम सोन्याचा दर 1,28,680 रुपये एवढा आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 3,380 रुपयाची वाढ झाली आहे. सोन्याच्या किमती ज्याप्रमाणे वाढत आहेत यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशावर याचा थेट परिणाम होत आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर

दागिने बनवण्यासाठी सर्वात जास्त वापर केल्या जाणारे बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये देखील आज मोठी वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोने आज प्रति तोळा 1,17,950 रुपये एवढे झाले आहे. कालच्या तुलनेत तब्बल 3000 रुपयाची वाढ यामध्ये झाली आहे. म्हणजेच आज दहातोळे सोन्याची किंमत 11,79,500 रुपये एवढे झाले असून काल 11,49,500 रुपये एवढा होता.

18 कॅरेट सोन्याची किंमत

हलके दागिने बनवण्यासाठी वापरला जाणारे 18 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील आज मोठी वाढ झाली आहे. आज 18 कॅरेट सोने प्रति तोळा 96,510 रुपये एवढे झाले आहे. कालच्या तुलनेमध्ये यामध्ये 2460 ची वाढ झाली आहे. दहा तोळ्याच्या खरेदीसाठी तब्बल नऊ लाख 65 हजार 100 रुपये द्यावे लागत आहेत. New Gold Price

चांदीचे दर देखील वाढले

सोन्या पाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज प्रति ग्रॅम चांदीचा दर 189 रुपये एवढा झाला असून कालच्या तुलनेमध्ये चार रुपयांनी वाढ झाली आहे. तर एक किलो चांदी 4,000 रुपयांनी वाढून आता 1,89,000 एवढी झाली आहे.

सोन्या चांदीच्या किमतीत सतत होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये नाराजी दिसत आहे. अनेकांनी सणासुदीच्या खरेदीला थोडं थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्या कुटुंबात लग्नकार्य किंवा विशेष प्रसंग आहेत त्यांना आता जास्त पैशात दागिने खरेदी करावेच लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची कमजोरी, मध्य पूर्वेत वाढता तणाव आणि गुंतवणूकदारांचा झुका सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे या तीन कारणांमुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment