ऐन दिवाळीमध्ये कांदा शेतकऱ्यांना रडवणार?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market News | सनासुदीच्या तोंडावरती कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आधीच शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही आणि त्यातच ही बातमी शेतकऱ्यांना नक्कीच टेन्शन वाढणार आहे. महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. परंतु आधीच दर घसरत असताना परदेशातून आलेल्या बातमीमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात दोन प्रमुख  कांदा उत्पादक राज्यांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात जुन्या रब्बी कांदा साठवून आहे. त्यात कर्नाटक, राजस्थान आणि गुजरात मधून नवीन कांद्याची आवक वाढत असल्याने बाजारात पुरवठा तुफान होणार आहे. आणि त्यामुळे  दरात अजून घसरण होईल, असं स्पष्ट संकेत तज्ञ देत आहेत. Onion Market News

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का?

लालसगाव, निफाड, सिन्नर या भागात कांद्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काय शेतकरी म्हणतात कांदा सडतोय पण भाव मिळत नाही. खर्च जरी निघाला तरी देवाची कृपा. आज अशी परिस्थिती आहे की उन्हाळा कांदाला बाजारात 200 ते 975 रुपये प्रति किलो दर मिळतोय. आणि या दरात उत्पादन खर्च सुद्धा परत येत नाही. निर्यातदार संघटनेच्या मते, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशांनी स्वतःचे

कांदा उत्पादन उत्पादन वाढवला आहे. त्यामुळे भारतातून जाणाऱ्या कांद्याची मागणी जवळपास संपली आहे. निर्यात थांबल्यामुळे देशातच कांदा साठा मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे भाव खाली पडत आहे.

परदेशी बाजारातून आली मोठी बातमी ?  

पूर्वी ज्या देशांनी भारतीय कांद्यांवर अवलंबून राहून खरेदी केली, त्या देशाने आता आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिला आहे. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ या स्थानिक पातळीवर उत्पादन वाढवलं. चीन आणि पाकिस्तानने तर भारतीय बियाणांचा वापर करून स्वतःचे उत्पादन सुरू केले. परिणामी भारतीय कांदा परदेशात विकला जात नाही, आणि इथल्या शेतकऱ्यांना थेट तोटा बसतोय. काला निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग म्हणाले, परदेशातून मागणी घटल्यामुळे बाजारात कांद्याचा साठा वाढतोय. भाऊ आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.  सरकारने किमान बियाणांच्या निरातीवर तरी बंदी घालावी, नाहीतर पुढे भारताचा कांदा बाजार संपेल.

खरतर यंदा सर्व शेतकऱ्यांवरती मोठे संकटाचा काळ कोसळलेला आहे महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस झाल्याने पूर्ण पिक व्हायला गेले त्यातच कुठे योग्य भाव मिळत नाही अशामुळे शेतकऱ्यांनी शेती करावे की नाही कांद्याचं पीक घ्यावा का नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!