1 ऑक्टोबर पासून हे नवीन नियम होणार लागू, सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार परिणाम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

October New rules | दर महिन्याच्या सुरुवातीला शासन कुठे ना कुठे बदल करतच, गॅस सिलेंडरचे दर असो, किंवा यूपआय, एटीएम अशा सुविधा असोत. कधी गॅस सिलेंडरचे दर वाढले तर सर्वसामान्यांना मोठा फटका बसतो. तसेच यूपीआय एटीएम यांच्या नियमात बदल झाल्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होते. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला देखील काही महत्त्वाचे आणि मोठे बदल होणार आहेत यामुळे सर्वसामान्यांना काही समस्यांना समोरे जावे लागू शकते. चला तर जाणून घेऊया कोणते मोठे नवीन बदल होणार आहेत. October New rules

एक ऑक्टोबर पासून देशात मोठे बदल होणार आहेत हे नक्की तसेच या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्याच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. सणासुदीच्या काळामध्ये सोन्याचे दर आकाशाला भिडल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. परंतु या काळामध्ये सरकारनं थोडासा दिलासा दिला आहे, तो म्हणजे जीएसटी मध्ये कपात. पण ऑक्टोबर पासून लागू होणारे हे नवीन नियम लोकांच्या खिशाला आणि सोयी सुविधांवर सरळ भिडणार आहेत.

यामध्ये रेल्वे प्रवास, पेन्शन, डिजिटल पेमेंट्स आणि गॅस सिलेंडरच्या किमती अशा गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे येत्या दिवसात घर खर्चापासून प्रवासापर्यंत सर्व गोष्टींमध्ये नवा बदल जाणवणार आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी तर मोठी बातमी आली आहे. आतापर्यंत ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना अनेकदा एजंट कडून गैरप्रकार होत असल्याचा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे रेल्वेने आता नवा नियम आणला आहे. 1 ऑक्टोबर पासून जेव्हा आरक्षण सुरू होईल तेव्हा पहिल्या 15 मिनिटात फक्त आधार कार्ड व्हेरिफाइड प्रवासीच तिकीट बुक करू शकणार आहेत. आतापर्यंत हा नियम फक्त तत्काळ बुकिंग साठी होता पण आता तो सर्वांसाठी लागू होणार आहे. मात्र रेल्वेच्या काउंटरवरून तिकीट घेणाऱ्यासाठी काही बदल होणार नाहीत.

पेन्शनधारकांसाठी सुद्धा नवीन नियम लागू होत आहेत. पेन्शन फंड रेगुलरिटी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने शुल्कांमध्ये बदल केला आहे. आता नवीन PRAN खाते उघडताना ई – PRAN किट साठी 18 रुपये आणि फिजिकल कार्ड साठी 40 रुपये द्यावे लागेल. त्याचप्रमाणे प्रत्येक खात्यावर वार्षिक शंभर रुपये मेंटेनेस चार्ज लागू होणार आहे. हा बदल थेट पेन्शन धारकांच्या खिशाला लागणार आहे.

दुसरीकडे UPI व्यवहारांमध्ये सुद्धा बदल होण्याची चिन्हे आहेत. Google pay, phone pe, पेटीएम सारख्या ॲप्स वापरणाऱ्या लाखो लोकांसाठी ऑक्टोबर महिना महत्त्वाचा ठरणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉपरेशन ऑफ इंडिया (NPCI) सुरक्षेसाठी व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांवर नवीन मर्याद आणण्याचा विचार करत आहे. म्हणजे पुढील महिन्यात थेट मोबाईल वरून होणारे व्यवहारांवर काही निर्बंध लागू झाले तर सर्वसामान्यांवर त्याचा परिणाम होणार आहे.

शेवटी म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीचाही प्रश्न आहे. एप्रिल महिन्यापासून 14 किलोच्या घरगुती गॅस च्या किमती स्थिर आहेत, पण आता एक ऑक्टोबरला नवा दर लागू होणार आहेत. किमती वाढणार की कमी होणारी अजून स्पष्ट नाही, पण बदल नक्कीच होणार आहे. त्यामुळे सनसुदीच्या तोंडावर लोकांच्या स्वयंपाक घरात दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचा ठरणार आहे.

हे पण वाचा | 1 एप्रिल पासून महावितरणाकडून घरगुती विज दरामध्ये नवीन नियम लागू! 

Leave a Comment