PanjabRao Dakh News | राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचे नुकसान झालेले आहे. आशाताच पुन्हा एकदा हवामान खात्याने आणि शेतकऱ्यांचे विश्वासू ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे आणि शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केलेले आहे. पंजाबराव यांच्या नवीन हवामान अंदाज मध्ये काय महत्त्वाची माहिती आहे हे एकदा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. PanjabRao Dakh News
राज्यात गेले काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे आधीच सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी कुठेतरी सावरत असताना हा अवकाळी पाऊस आता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेत आहे. मराठवाड्यामध्ये कापूस पिकांची वेचणी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे तेथील कापूस भिजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने झाडाचा कापूस खाली मातीमध्ये पडलेला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तर या परिस्थितीमध्ये, पंजाबराव यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती एक हवामान अंदाज वर्तवत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ४ नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर पंजाबराव यांनी सांगितले की 7 नोव्हेंबर पासून राज्यात पावसाची उघडतील पाहायला मिळू शकते. परंतु जाता जाता पाऊस हा परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये चार ते पाच तारखेला पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव यांनी व्यक्त केली आहे. तर राज्यात सात तारखेनंतर पाऊस कमी होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
तर राज्यातील थंडीबाबत देखील त्यांनी एक महत्त्वाची अपडेट दिलेले आहे तर तुम्ही सविस्तर हवामान अंदाज खालील दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.