शेतकऱ्यांच्या खात्यावरती या तारखेला येणार 21 वा हफ्ता, आली मोठी अपडेट समोर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana: देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसाठी लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चा 21 वा हप्तात जमा करणार आहेत. नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात हा लाभ मिळण्याची शक्यता आता काही नामांकित प्रसारमाध्यमांमध्ये माहिती झळकत आहे.

या प्रसारमाध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छट पूजा नंतर हप्ता देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अद्याप कुठलीही घोषणा शासनाच्या माध्यमातून झालेली नाही. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदतीने समान हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाते. म्हणजे दोन-दोन हजारांचा एक हप्ता ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाते.

आतापर्यंत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20 हप्ते जमा करण्यात आलेले असून, या योजनेचा लाभ देशभरातील ११ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मिळालेला आहे. आता अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. काही प्रसार माध्यमांमध्ये हा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिला जाणार अशी शक्यता वर्तवली होती, परंतु आता पुढील हप्ता हा काही दिवसात जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान देशभरातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून एक सूचना जारी केलेली आहे, E KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे तरच शेतकऱ्यांना लाभ मिळेल. पारदर्शकता राखण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी हे सरकारने पाऊल उचललेले आहे. ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेला आहे आणि ज्यांनी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होईल नाहीतर शेतकऱ्यांचा हप्ता थांबला जाऊ शकतो.

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर pmkisan.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन केवायसी ऑनलाईन करायची आहे. यासाठी होम पेजवरील केव्हाशी पर्याय निवडून आधार क्रमांक टाकावा, त्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करावा. पडताळणीनंतर प्रक्रिया पूर्ण होते. तसेच जर तुम्ही हे करू शकत नसाल तर आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर ऑफलाइन पद्धतीने करू शकता. सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही परंतु लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. लाखो शेतकरी या योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

(Disclaimer : वरील दिलेली माहिती केवळ प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही शेतकरी बांधवांनो योग्य माहिती जाणून घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवावे)

हे पण वाचा | PM किसानचा 20वा हप्ता हुकणार? ‘ही’ 5 कामं केली नसतील तर लगेच करा..

Leave a Comment