PM Kisan Yojana: देशभरातील करोडो शेतकरी आतुरतेने PM किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जून महिन्याच्या अखेरीस ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी काही शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची ही मदत मिळणार नाही, कारण त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे. तुमच्या बँक खात्यात 20वा हप्ता यावा असं वाटत असेल, तर खालील ५ गोष्टी तुम्ही पूर्ण केल्या आहेत का, हे तपासा. जर केल्या नसतील, तर तात्काळ त्या पूर्ण करून घ्या.
PM किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- e-KYC पूर्ण केलं आहे का?
भारत सरकारने आता e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) बंधनकारक केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही PM किसान पोर्टलवर OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे e-KYC पूर्ण केले नाही, त्यांना यावेळेस 20वा हप्ता मिळणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
- जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे का?
तुमच्या जमीन-शेतीच्या कागदपत्रांची पडताळणी झाली नसेल, तर तुमचं नाव PM किसानच्या लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकतं. प्रत्येक राज्य सरकार जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी करत आहे. त्यामुळे, तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे की नाही, हे तपासून घ्या. PM Kisan Yojana
हे पण वाचा| सातबाऱ्यावर ‘या’ शब्दांचा उल्लेख नसेल तर जमीन जप्त होऊ शकते! एकदा सर्व नियम जाणून घ्या..
- बँक खाते आधारशी लिंक आहे का?
अनेक शेतकऱ्यांचे व्यवहार यापूर्वीही याच कारणामुळे रद्द झाले आहेत. जर तुमचं बँक खाते आधारशी लिंक नसेल, तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची 20वी किस्त अडकू शकते. लवकरात लवकर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या.
- अर्ज करताना योग्य माहिती दिली होती का?
ज्या शेतकऱ्यांनी PM किसानसाठी अर्ज करताना चुकीची कागदपत्रे, बनावट आधार किंवा खोटी जमिनीची माहिती दिली आहे, त्यांचा लाभ थेट रोखला जाईल. सरकारने अशा प्रकरणांवर कडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे, अर्ज करताना कोणतीही खोटी माहिती दिली नसावी याची खात्री करून घ्या.
हे पण वाचा| राज्यात कांद्याला चांगला बाजार भाव! शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या आहे कांदा दर…
- तुम्ही योजनेसाठी पात्र आहात का?
PM किसान योजनेअंतर्गत फक्त पात्र शेतकऱ्यांनाच हप्ता मिळतो. जे शेतकरी अपात्र आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने या योजनेत सामील झाले आहेत, त्यांचे अर्ज तपासणीनंतर रद्द केले जातात. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने योजनेत सामील झाला असाल, तर आधीच तुमचे नाव मागे घ्या. अन्यथा, भविष्यात अडचणी येऊ शकतात.
या पाचपैकी कोणतीही गोष्ट अपूर्ण असेल तर ती तात्काळ पूर्ण करून घ्या. यामुळे तुमच्या खात्यात 20व्या हप्त्याची रक्कम वेळेवर जमा होईल आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
6 thoughts on “PM किसानचा 20वा हप्ता हुकणार? ‘ही’ 5 कामं केली नसतील तर लगेच करा..”