Pm Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढील हप्ता जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळते आणि ते दोन हजार रुपयांच्या स्वरूपात प्रतिकी तीन हप्त्यांमध्ये विभाजन करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतात. मात्र यंदा काही शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादी मधून वगळले असल्याची बातमी समोर आलेली आहे. Pm Kisan Yojana
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये केंद्र सरकार 21 वा हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT अंतर्गत जमा करू शकते अशी माहिती समोर आलेली आहे. परंतु अद्याप कुठलाही अधिकृत निर्णय झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी या माहिती वरती विश्वास न ठेवता सरकारच्या घोषणाकडे वाट पाहावी.
शेतकऱ्यांचे नाव यादी मधून वगळले?
प्रसार माध्यमांमध्ये सध्या पीएम किसान चे हप्त्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. परंतु त्यापूर्वी काही शेतकऱ्यांचे नावे यादी मधून वगळी असल्याची माहिती समोर आली आहे. चे महत्वाचे कारण माझे शेतकऱ्यांनी पूर्ण न केलेली E केवायसी प्रक्रिया, तसेच आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसणे. पत्ता किंवा जमिनीच्या नोंदी बाबत चुका असणे व बँक खाते क्रमांक किंवा आयएफसी कोड चुकीचा असणे. अशा शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नोंद नसणे अशाप्रकारे काही लाभार्थींची माहिती तपासून समोर आलेले आहे जर तुमची माहिती चुकीची किंवा ऑफर आढळली असेल तर तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे तुमची माहिती वेळेत तपासा आणि दुरुस्त करा त्यासाठी जवळच्या सीएससी केंद्रात किंवा कृषी विभागांमध्ये जाऊन खात्री करा.
तुमचे नाव यादीत आहे का चेक करा
जर तुमचे नाव यादीमध्ये आहे का नाही हे जर तुम्हाला चेक करायचा असेल तर या योजनेचे अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे फार्मर कॉर्नर विभागात जा त्यानंतर लाभार्थी यादी लाभार्थी क्लिक करा. त्यानंतर आपले राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडा आणि गेट रिपोर्ट वरती क्लिक करा. यानंतर संपूर्ण यादी दिसेल. जर तुमचं नाव यादीत असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. हप्ता जाहीर होताच पैसे थेट जमा होतील.
(Disclaimer : वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)
हे पण वाचा | PM किसानचा 20वा हप्ता हुकणार? ‘ही’ 5 कामं केली नसतील तर लगेच करा..