PM Kisan Yojana : या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹2 हजार रुपये? आली मोठी न्यूज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana : देशभरातील कोट्यवधी शेतकरी सध्या एका प्रश्नाची वाट पाहत आहेत पीएम किसानचा २२वा हप्ता नेमका कधी येणार? फेब्रुवारी महिन्यात पैसे जमा होतील, अशी अपेक्षा होती; मात्र महिन्याचा शेवट जवळ आला तरी खात्यात ₹२००० जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चर्चा सुरू झाली आहे. आता हा हप्ता पुढील महिन्यात, म्हणजेच मार्चमध्ये येण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. PM Kisan Yojana

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi या योजनेअंतर्गत देशातील सुमारे ९ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६००० ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांत, म्हणजे दर चार महिन्यांनी ₹२००० प्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत २१ हप्ते वितरित करण्यात आले आहेत. शेवटचा २१वा हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा झाला होता. त्यामुळे फेब्रुवारीत २२वा हप्ता अपेक्षित होता. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, हा हप्ता मार्च महिन्यात जमा होऊ शकतो. विशेष म्हणजे यंदा होळीचा सण २-३ मार्चदरम्यान साजरा होणार आहे. त्यामुळे सणापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत केंद्र सरकारकडून किंवा संबंधित विभागाकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

दर चार महिन्यांनी हप्ता दिला जात असला तरी यापूर्वीही काही वेळा हप्ते उशिरा जमा झालेले आहेत. २१वा हप्ताही नियोजित वेळेपेक्षा उशिरा जमा झाला होता. त्यामुळे २२वा हप्ता उशिरा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या फेब्रुवारी महिना संपत आला असूनही पैसे न आल्याने शेतकऱ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आता सर्वांचे लक्ष मार्च महिन्याकडे लागले आहे. होळीआधी ₹२००० खात्यात जमा झाले, तर शेतकऱ्यांना सणासुदीच्या खर्चासाठी मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. २२व्या हप्त्याची तारीख कधी जाहीर होते आणि पैसे नेमके कधी खात्यात येतात, याकडे देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

हे पण वाचा : शेतकऱ्यांनो! 30 मे पूर्वी ‘हे’ काम करा, नाहीतर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही…

Leave a Comment

error: Content is protected !!