शेतकऱ्यांनो! 30 मे पूर्वी ‘हे’ काम करा, नाहीतर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आपण सगळ्यांना माहीतच आहे. याच योजनेतून सरकार आपल्या हातात वर्षाला 6000 रुपये टाकतं थेट बँकेत. आतापर्यंत 19 वेळा हप्ते मिळालेत. पण, आता 20 व्या हप्त्याची वाट सगळे शेतकरी पाहतायत. मात्र, त्याआधी एक महत्त्वाचं काम उरकणं गरजेचं आहे. ते म्हणजे ई-केवायसी आणि आधार लिंकिंग करणे गरजेचे आहे.

हे पण वाचा | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जाणून घ्या सोने खरेदीसाठी योग्य वेळ कोणती?

ई-केवायसी नसेल तर 2,000 रुपये मिळणार नाही

सरकारनं स्पष्ट सांगितलं आहे, जर ई-केवायसी पूर्ण केली नसेल, तर हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. म्हणजे बियाण्याचे, खताचे, ट्रॅक्टर डिझेलचे सगळे हिशेब कोलमडणार आहे. म्हणूनच 30 मे च्या आत ई-केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे. 30 मे पर्यंत केवायसी केली नाही तर तुमच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जमा होणार नाही. PM Kisan Yojana

हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार; या तारखेला जमा होणार ₹1500?

ई-केवायसी कशी कराल?

  1. pmkisan.gov.in या वेबसाइटवर जाऊन स्वतः ई-केवायसी करा.
  2. PM-Kisan मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा आणि फेस ऑथेंटिकेशन करून प्रक्रिया पूर्ण करा.
  3. जवळच्या CSC (सेवा केंद्र) किंवा SSK सेंटरमध्ये जाऊन मदत घ्या.

हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेसाठी ३३५ कोटी वळवले, मे महिन्याचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येणार..

आधार बँक खात्याशी लिंक असावे

काही शेतकऱ्यांचं ई-केवायसी झालेलं असतं, पण खात्याशी आधार लिंक नसतं. त्यामुळे पैसे अडकतात, नाव यादीतून वगळलं जातं. यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. पी एम किसान योजनेचे पैसे महाडीबीटी द्वारे पाठवले जातात त्यामुळे तुमच्या बँक खात्याला तुमच्या आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होऊ शकतील.

हे पण वाचा | ८ जूनपासून ‘या’ ३ राशींचा येणार सोन्याचा काळ, धन, मान-सन्मान, प्रगतीचा वर्षाव होणार?

आधार बँकेत कसं लिंक कराल?

  • ज्या बँकेत पीएम किसानचं खातं आहे, तिथे जा.
  • आधार कार्डाची झेरॉक्स द्या आणि लिंकिंगची विनंती करा.
  • आधार पडताळणी झाली की, मोबाईलवर SMS येईल.

शेतकरी भावांनो, सध्या बियाण्याचा, खताचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय. सरकारकडून मिळणारे हे 2,000 रुपये कुणालाही मोठे वाटणार नाहीत, पण आपल्यासाठी ते शेतीसाठीचा आधार आहे. जर वेळेवर ई-केवायसी आणि आधार लिंकिंग केली नाही, तर नुकसान फक्त तुमचंच होईल. म्हणून कुठल्याही भ्रमात न राहता, आजच हे काम उरका. तुमचा 20 वा हप्ता तुमच्या खात्यात येण्यासाठी हीच वेळ आहे. नाहीतर उशीर झाला, तर नुसती वाट पाहत राहाल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “शेतकऱ्यांनो! 30 मे पूर्वी ‘हे’ काम करा, नाहीतर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही…”

Leave a Comment