शेतकऱ्यांनो मुहूर्त ठरला! या तारखेला खात्यामध्ये जमा होणार पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana 21th Hapta | शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आलेले आहे. जर तुम्ही pm किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर बातमी नक्की वाचा खूप महत्त्वाची ठरणार आहे. केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी, एक महत्त्वाची योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कुठल्याही मध्यस्थी शिवाय थेट त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाते. या योजनेत देशभरातील कोट्यवधी शेतकरी लाभ घेत आहेत. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर दिवाळी संपताच तुमच्यासाठी एक महत्त्वाची गुड न्यूज समोर आलेले आहे. Pm Kisan Yojana 21th Hapta

अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुढील हप्ता कधी येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता तर त्या साठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत येणारे सहा हजार रुपये शेतकऱ्यांसाठी एक मोठी मदत आहे. परंतु ही रक्कम शेतकऱ्यांना डायरेक्ट मिळत नाही तर दोन-दोन हजार रुपयांच्या स्वरूपात तीन हप्ते दिले जातात.

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती शासनाच्या माध्यमातून 20 हप्ते दिले आहेत. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यातील शेतकऱ्यांना 21 वा हप्ता दिवाळी आधीच मिळालेला आहे. कारण म्हणजे या राज्यांमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली होती आणि पुरस्थिती मधून सावरणसाठी थोडा हातभार लावण्यासाठी शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रात देखील अशीच मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही साहजिकच शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. परंतु लवकरात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बाकी राज्य प्रमाणे पुढील हप्ता व्यतिरिक्त करण्यात येणार आहे.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, छटपूजेनंतर पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या योजनेचा पुढील हप्ता जमा केला जाऊ शकतो.

केंद्रीय कृषी विभागाने सुद्धा अलीकडेच सर माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल अशी शक्यता दिली आहे. परंतु या संदर्भात अजून कुठल्याही अधिकृत पत्र किंवा अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हप्ता कधी जमा होणार कधी मिळणार असा प्रश्न विचारत आहेत. आता हा आता कधी जमा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे, शेतकरी बांधवांनी हप्ता व योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी शासनाच्या घोषणाकडे वाट पाहावी.)

Leave a Comment