Pm Kisan Yojana | दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये येणार? त्यापूर्वी हे 4 काम पूर्ण करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी लोकप्रिय असलेली केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा मदतीचा हात ठरत आहे. या योजनेत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार (₹6000) रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यामध्ये पाठवतात. ही रक्कम प्रत्येकी दोन-दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाते. आतापर्यंत वीस हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले असून 21 वा हप्ता लवकर शेतकऱ्यांना येणार आहे. Pm Kisan Yojana

परंतु या वेळेस सरकारने काही महत्त्वाचे नियम स्पष्ट केले आहेत. जर लाभार्थी शेतकऱ्यांनी काही आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या नाही, तर त्यांचे पैसे अडकू शकतात. सध्या पंजाब, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांना 21वा हप्ता देण्यात आलेला आहे. उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पैसे मिळण्याची शक्यता आहे. Pm Kisan Yojana

शेतकऱ्यांनी ही लगेच चार कामे पूर्ण करावी?

  • सर्वात पहिले काम म्हणजे हप्ता येण्याआधी e-KYC पूर्ण करा, तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर लिंक करून घ्या.
  • भू सत्यपान करून घ्या म्हणजे जमिनीची माहिती अपडेट करा.
  • फार्म रजिस्ट्रेशन करा ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांना फायदा मिळणार नाही.
  • बँक खात्यात DBT इनबल करा चुकीचे खाते नाव असल्यास हप्ता थांबू शकतो.

जर ही वरील दिलेली चार कामे, पूर्ण न केल्यास यादी मधून तुमचे नाव कमी केले जाऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपलं नाव तपासून घ्या.

या लोकांना हप्ता मिळणार नाही?

ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, ज्यांच्याकडे मोठ्या जमिनी आहेत, सरकारी नोकरी करणार, मंत्री, नगरसेवक, कर दाता, डॉक्टर, वकील, इंजिनीयर आणि अशा व्यवसायिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले आहे त्यांच्यावर सरकार कारवाई करून पैसे वसूल करणार आहे.

यादीत तुमचे नाव तपासा

Pm Kisan योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर Pmkisan.gov.in वर जा Farmer Corner मध्ये Beneficiary List निवड, राज्य, जिल्हा तालुका गाव निवडा. त्यानंतर Get रिपोर्टवर क्लिक करा. तुमचं नाव यादीत दिसलं तर समजा हा हप्ता तुम्हाला येणार आहे .PM किसानचा 21वा हप्ता हुकणार? ‘ही’ 5 कामं केली नसतील तर लगेच करा..

Leave a Comment