Pm Kisan Yojana | देशभरामध्ये सध्या सणाचे दिवस सुरू आहेत, यातच शेतकऱ्या बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. दिवाळी जवळ आल्याने पी एम किसान योजनेचा हप्ता कधी येणार याची वाट शेतकरी आतुरतेने पाहत आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली पंतप्रधान किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरत आहे कारण या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. प्रत्येकी दोन दोन हजारांच्या तीन हत्यांमध्ये पैसे येतात. पण यंदा दिवाळीच्या अगोदर पैसे येणार का नाही याबद्दल सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. Pm Kisan Yojana
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून अजून हप्त्याच्या तारखेची अधिकृत घोषणा झालेली नाही. सुरुवातीला चर्चा होती की दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, पण आता संकेत मिळत आहेत की हप्ता थोडा उशिराने म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो.
बिहार निवडणुकीपूर्वी होऊ शकतो निर्णय?
माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात Pm सन योजनेचा 21 वा हप्ता जारी करू शकते. बिअर मध्ये निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने हे पाऊल निवडणुकीपूर्वी घेतले जाईल, अशी शक्यता वर्तवले जात आहे. 6 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात 11 नंबर रोजी दुसरा टप्प्यात आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच हप्ता जारी करून शेतकऱ्यांना दिलासा दिल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, आचारसंहिता लागू असल्याने सरकार हा हप्ता शेतकऱ्यांचा खात्यावरती जारी करेल का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. मात्र, यादीच काही राज्यांमध्ये आता वितरित करण्यात आलेला आहे. 26 सप्टेंबरला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांनी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांचा खात्यात पैसे जमा केलेले आहे. तिथल्या पूर आणि भूस्खलनग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून हा हप्ता आगाऊ दिला गेला होता. त्यानंतर सात ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. मात्र, इतर राज्यातील शेतकऱ्यांना आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागेल, असं स्पष्ट होतंय.
काय आहे ही योजना ?
फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत मिळते आहे. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये थेट बँकेत जमा होतात. योजना सुरू करण्याबागचा उद्दिष्ट म्हणजे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या शेतीच्या खर्चात हातभार लावले. ऑगस्ट 2025 मध्ये सरकार 20 वा हप्ता दिला होता, ज्याचा लाभ तब्बल 8.5 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळाला आहे.
या शेतकऱ्यांना मात्र हप्ता मिळणार नाही
केंद्र सरकारने स्पष्ट केल आहे की, ज्यांची e KYC पूर्ण नाही किंवा ज्यांचे बँक खाते आधार कार्ड असे लिंक नाही, अशा शेतकऱ्यांना यंदाचा हप्ता मिळणार नाही. तसेच, जे शेतकरी 1 फेब्रुवारी 2019 नंतर नवीन जमीन विकत घेतात, त्यांना पुढील पाच वर्षे या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, जमीन वारसा हक्काने मिळाल्यास तो शेतकरी पात्र राहील.
हे पण वाचा | PM किसानचा 20वा हप्ता हुकणार? ‘ही’ 5 कामं केली नसतील तर लगेच करा..