सरकार देणार यांना 3 हजार रुपये महिना; जाणून घ्या या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Shram Yogi Mandhan Yojana: भारत सरकार अंतर्गत राज्यातील कामगारांना दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळते. कामगारांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल व या योजनेचा कोण लाभ घेऊ शकतो. अर्ज प्रक्रिया काय, कुठे करायचं ? सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा

भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवते. त्यामुळे देशातील गरीब आणि गरजू लोकांना त्या योजनेचा फायदा होतो. भारतात अनेक मंजूर असंघटित आहेत. अशा नागरिकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्याच योजनेप्रमाणे ही एक योजना खूप लोकप्रिय बनत चाललेली आहे. पीएम श्रम योगी मानधन योजना ही गरीब आणि असंघटित मजुरांना मोठा फायदा देत आहे.

देशभरातील गरीब नागरिकांना त्यांचे उत्पन्न आणि पेन्शन अजिबात स्थिर नाही. अशा लोकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने ही योजना राबवली आहे. ज्या अंतर्गत मजुरांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते. कामगार पैसे कसे उभं करू शकतात. या योजनेचा फायदा त्यांना होणार आहे. त्यासाठी प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पीएम श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत पेन्शन कशी मिळेल ?

भारत सरकारने देशभरातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी 2019 मध्ये पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना सुरू केली. ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या वयाच्या 60 वर्षानंतर सरकार त्यांना तीन हजार रुपये पेन्शन देत आहे. मजुराने दिलेल्या योगदाना प्रमाणे सरकारी या योजनेला तेवढीच रक्कम देत आहे. म्हणजे जर एखाद्या मजुराने शंभर रुपये गुंतवणूक केली तर त्याला सरकार शंभर रुपये देत आहे. Pm Shram Yogi Mandhan Yojana

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी कामगाराचे वय 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे. जेणेकरून किमान वीस वर्षे योजनेत योगदान देता येईल. वयाच्या 60 वर्षानंतर सरकार त्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार आहे. योजनेत लवकरात लवकर अर्ज कसा करता येईल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोणत्या कामगारांना मिळणार फायदा ?

योजना फक्त असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी बनवली आहे. या योजनेअंतर्गत फक्त असंघटित क्षेत्रातील मजूर अर्ज करू शकतात. यामध्ये रिक्षा चालक, घर कामगार, चालक, विणकर, प्लंबर, रस्त्यावरील विक्रेते, शिंपी, भोजन कामगार, बांधकाम कामगार, चिंध्या वेचणारे, शेती कामगार, मोची, धोबी, चामडे कामगार, विडी बनवणारे इतर मंजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पीएम श्रमयोगी मानधन योजनेसाठी असा करा अर्ज

या योजनेत अर्ज करण्यासाठी कामगारांना जवळच्या सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करता येणार आहे. त्यानंतर आपले आधार कार्ड आणि बँक तपशील सोबत घेऊन नोंदणी करू शकता. फोन नंबर बँका खात्याशी जोडणे आवश्यक आहे. तुमचे खाते उघडतास तुम्हाला त्याची माहिती तुमच्या मोबाईल नंबर वर मिळणार आहे.

या योजनेच प्रीमियम तुमच्या खात्यामधून आपोआप कट केली जाणार आहे. मात्र, या योजनेतील प्रथम योगदान रोख स्वरूपात द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात.

Leave a Comment

x
error: Content is protected !!