Post Office Scheme : जर तुम्हाला गुंतवणूक कराची आहे आणि कुठे गुंतवणूक करावी हे जर समजत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जिथे तुम्हाला गुंतवणूक करण्याची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. सध्या अनेक जण सुरक्षित गुंतवणूक आणि मोठा परतावा मिळू इच्छित आहेत तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना खूप महत्त्वाचे ठरत आहेत. सध्या पोस्ट ऑफिसच्या या योजनेत बँकेच्या एफडी पेक्षा जास्त व्याज मिळत आहे आणि सुरक्षित देखील आहेत यासाठी तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. सीनियर सिटीजन सेविंग स्कीम एक फायद्याची ठरणार आहे. Post Office Scheme
पोस्ट ऑफिसची सीनियर सिटीजन सेविंग स्कीम गुंतवणूकदारांना निश्चित आणि दमदार परतवा देणार आहे. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना दहा वीस हजार रुपये देखील व्याज मिळवता येतं. पण ही योजना फक्त सिनिअर सिटीजन ग्राहकांसाठी आहे. त्यामुळे या योजनेत फक्त सिनिअर सिटीजन ग्राहकच पात्र ठरणार आहेत. तुम्ही म्हणाल यामध्ये गुंतवणूक कशी करायची व या योजनेतून दर महिन्याला 20 हजार रुपयांची कमाई कशी करायची याच संपूर्ण कॅल्क्युलेशन आपण या लेखांमधून समजून घेणार आहोत.
या योजनेत गुंतवणूक कशी करायची?
जर तुम्ही देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे तरी या योजनेत गुंतवणूक करता येते. तसेच वेळेआधी व्ही आर एस म्हणजे सेवेच्या निवृत्ती घेतात त्यांना सुद्धा या योजनेत गुंतवणूक करता येते. नागरिक क्षेत्रामधील सरकारी पदांवरून VRS घेतलेल्या 55 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच संरक्षण क्षेत्रातील 50 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्ती म्हणजे सेना हवाईदल, नौदल आणि इतर सुरक्षा क्षेत्रातील दलातील नागरिकांना देखील यामध्ये गुंतवणूक करता येते.
कसे मिळणार वार्षिक 2.46 लाखांचे व्याज
पोस्ट ऑफिसच्या या लोकप्रिय योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला नफा होणार आहे. सध्या पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 8.2% व्याज दिले जात आहे. जे की सध्या कोणत्याही बचत योजनेच्या तुलनेत फारच अधिक आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून नक्कीच मोठा फंड तयार करू शकणारा.
नेमकं तुम्हाला काय करायचं आहे? तर या योजनेमध्ये तुम्हाला एक निश्चित रक्कम गुंतवणूक करायचे आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला मोठा निधी उभारू शकता. दरमहा कमाईचे साधन म्हणून या योजनेकडे सध्या अनेक नागरिक पाहत आहेत. भारतीय आयकर विभागाच्या कलम 80 C अंतर्गत १.५ लाख रुपये पर्यंत गुंतवणुकीवर सरकारकडून आयकर सुद्धा मोफत दिला जातो.
या योजनेमध्ये सिंगल जॉईंट अकाउंट दोन्हीही ओपन करता येते ही योजना पाच वर्षांनी परिपक्व होते समजा एखाद्या गुंतवणूकदारांनी या योजनेमध्ये तीस लाख रुपये पर्यंत गुंतवणूक केली तर त्याला 2.46 लाख रुपये पर्यंत व्याज मिळणार आहे.
म्हणजे अर्थातच पाच वर्षासाठी तीस लाख रुपयांचे गुंतवणूक आणि प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपये व्याज मिळणार आहे विशेष म्हणजे या योजनेत अकाउंट ओपन केल्यानंतर कधीही बंद करता येते पण अकाउंट ओपन केल्याचा एक वर्षाच्या आत बंद केले तर तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो.
सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस या योजनेचा विचार करू नको गरजेचा आहे जेणेकरून तुम्हाला निवृत्तीनंतर नक्कीच मोठा लाभ होणार आहे.
