Post Office Scheme | रिटायरमेंट नंतर नियमित उत्पन्न हवा आहे? बँक, शेअर बाजार, म्युचल फंड यांचा धोका वाटत आहे? तर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीम म्हणजे एक भन्नाट योजनाच आहे तिथे तुम्ही तुमचे पैसे गुंतवणूक करून शंभर टक्के सुरक्षित आणि दर महिन्याला खात्यात पेन्शन सारखी रक्कम जमा होते.
आज-काल अनेक जण गुंतवणूक करण्याच्या मागे धावत आहे, कुठे कोणी शेअर बाजारात गुंतवणूक करतो, तर कोणी म्युच्युअल फंडमध्ये पण तू अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी चढउतार असल्याने तोटा होण्याचा धोका संभवतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही चांगला परतावा मिळू इच्छित असाल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना खूपच महत्त्वाची आहे आणि लोकप्रिय देखील बनत चाललेले आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी आम्ही तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहोत चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
कोण कोण गुंतवणूक करू शकता.
या योजनेमध्ये साठ वर्षावरील कुणीही नागरिक सहभागी होऊ शकतो. रिटायर झाल्यानंतर पीएफ ग्रॅज्युएटी किंवा किंवा सेव्हिंग अकाउंट मधला पैसा इथे लावू शकता. पती-पत्नी मिळून जॉईन अकाऊंट उघडल्यास साठ लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. परंतु एकट्या व्यक्तीसाठी मर्यादा 30 लाख रुपये आहे. म्हणजे सुरुवातीला 1000 रुपयापासून सुरू करता येते आणि ही योजना पाच वर्षाची असली तरी आणखी तीन वर्षे वाढवण्याची मर्यादा आहे.
दर महिन्याला ११ हजार रुपये कसे मिळणार?
या योजनेवर सध्या सरकार 8.2% वार्षिक व्याज देत आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याने 15 लाख रुपये गुंतवले, तर वर्षभरात जवळपास 1.23 लाख रुपये व्याज मिळतं. हे बारा महिन्यात विभागलं, तर दर महिन्याला जवळपास 11750 रुपये बँक खात्यामध्ये जमा होतात. आणि सर्वात मोठे म्हणजे हा पैसा मार्केटच्या चढउतारांवर अवलंबून नाही म्हणजे शेअर बाजार घसरला तरी तुमचा पैसा सुरक्षित राहणार आहे.
तर तुम्ही अकाउंट खोलण्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा रजिस्टर बँकेत जाऊ शकता. फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, दोन पासपोर्ट फोटो, आणि गुंतवणुकीचा सोर्स दाखवावा लागतो. व्याज प्रत्येक ती माहित थेट तुमच्या बँकांच्या जमा होतात. जर तुम्हाला हवा असेल तर हे व्याज पुन्हा इन्व्हेस्टमेंट करून रक्कम वाढू शकता. पाच वर्षांपूर्वी पैसे काढले तर थोडा किरकोळ दंड लागू शकतो. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या योजनेचा एकदा विचार करायलाच हवा.
( Disclaimer : वरील दिलेली माहिती केवळ माहिती करीत आहे गुंतवणुकी बाबत कुठलाही सल्ला नाही.)
हे पण वाचा | Post Office Scheme: महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना देतील जबरदस्त नफा; जाणून घ्या सविस्तर..
