Post Office Scheme: आजकालच्या काळात प्रत्येक जणांना सुरक्षित गुंतवणूक करावी अशी अपेक्षा असते. ज्या गुंतवणुकीतून नियमितपणे ठराविक उत्पन्न मिळेल. शेअर मार्केटचा धोका नको, बँकेपेक्षा जास्त परतावा हवा आहे आणि सरकारी हमी देखील हवी आहे आशांसाठी पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना फायद्याची ठरते. पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम मध्ये एक वेळा पैसे गुंतवले की दर महिन्याला ठराविक व्याज दिले जाते. योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी दर महिन्याला पगार मिळवून देणारी सुरक्षित योजना आहे.
फक्त एकदाच गुंतवा आणि दर महिन्याला मिळवा
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच या योजनेत गुंतवणूक करायची आहे आणि दर महिन्याला व्याजातून परतावा मिळवायचा आहे. म्हणजेच तुम्हाला कोणतेही काम न करता घरबसल्या ठराविक रक्कम दर महिन्याला मिळेल. सध्या या योजनेअंतर्गत 7.4% वार्षिक व्याजदर दिला जात आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही या योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 9250 रुपये व्याजातून मिळतील. एक वर्षात अशा पद्धतीने तुम्ही एक लाख 11 हजार रुपये नफा मिळू शकतात. त्याचबरोबर पाच वर्षानंतर तुम्हाला तुमची मूळ रक्कम परत मिळते.
सिंगल आणि जॉईंट अकाउंट ची सुविधा
पोस्ट ऑफिसच्या मंत्री इन्कम स्किन मध्ये तुम्ही दोन प्रकारे खाते उघडू शकता. यामध्ये सिंगल अकाउंटला गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा 9 लाख रुपये एवढी आहे. त्याचबरोबर जॉइंट अकाउंटला गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा 15 लाख रुपये एवढी आहे. जॉईन अकाउंट मध्ये पती-पत्नी एकत्र मिळून खाते उघडू शकतात आणि दर महिन्याला 9250 रुपये उत्पन्न मिळू शकतात. Post Office Scheme
या योजनेचा कालावधी पाच वर्ष असला तरी तुम्हाला गरज असल्यास कालावधी पूर्ण होणे आधीच पैसे काढता येतात. त्यासाठी काही नियम ठेवण्यात आले आहेत. एक ते तीन वर्षाच्या आत पैसे काढल्यास 2 टक्के दंड भरावा लागतो. तीन ते पाच वर्षाच्या आत पैसे काढल्यास 1 टक्के दंड भरावा लागतो. म्हणजेच तुम्हाला इमर्जन्सी पैशाची गरज असल्यास तुमची रक्कम वाढत नाही तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा तुमची रक्कम मिळू शकतात.
कोण गुंतवणूक करू शकतात?
पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही पात्रता निकष आहेत ते खालील प्रमाणे आहेत.
- सर्वप्रथम या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- जर मुलाचे वय दहा वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना या योजनेत खाते उघडता येते.
- पालक लहान मुलांच्या नावाने खाते उघडून त्यांचे संचालन करू शकतात.
- खातो उघडण्यासाठी पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट आधार कार्ड आणि पॅन कार्ड आवश्यक आहे.
पोस्ट ऑफिसच्या योजनेला भारत सरकारचे हमी असल्यामुळे या योजना 100% सुरक्षित आहेत. त्यामुळे गुंतवणूक केल्यावर तुमची रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना ही योजना दरमहा उत्पन्न देऊन घर खर्च भागवण्यास मदत करू शकते. आजकालच्या महागाईच्या काळात स्थिर उत्पन्न मिळणारे ही योजना मध्यमवर्गीयांसाठी वरदानच आहे. पोस्ट ऑफिस मंत्री इन्कम स्कीम ही अशी योजना आहे जी तुमची बचत पेन्शनमध्ये रूपांतरित करते. या योजनेमध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि दर महिन्याला परतावा मिळवा. नोकरीतून निवृत्त झालेल्या किंवा स्थिर उत्पन्न शोधणाऱ्या लोकांसाठी ही योजना खूपच फायद्याची ठरते.