Gold Rate Today | सोन्याच्या भावात झाली अचानक मोठी वाढ! दर पाहून तुम्हाला धक्काच बसेल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरामुळे सातत्याने वाढ होत आहे. यामुळे बाजारात धावपळ सुरू झालेली आहे कोणी सोन बुक करून ठेवताय तर कोणी खरेदी करीत आहे. अशातच सणासुदीच्या काळामध्ये एक सर्वसामान्यांची टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेले आहे. जर तुम्ही देखील सणासुदी निमित्त किंवा गुंतवणुकीनिमित्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल आज सोन्याचा नवीन दर काय आहे एकदा जाणूनच घ्या. कारण गेल्या काही दिवसात चांदीच्या भावात तब्बल 15000 रुपयांनी वाढ झाली तर सोन्याच्या भावात पाच हजार रुपयांनी वाढ झाली.

सोन्या-चांदीचा बाजार म्हणजे एक प्रकारे भावनाच केंद्रच असतं. लोकांचा विश्वास, बचत आणि परंपरा सगळं सोन्यामध्ये गुंतवलेलं असतं. पण सध्या दरांच्या वाढीमुळे खिशाच गणितच बिघडलं आहे. आज सकाळपासून सराफ बाजार मध्ये दरांचा असा जोर चढला की केवळ एका तासात चांदीच्या भावा 7000 रुपयांची विक्रमी वाढ तर गेल्या दहा दिवसापासून दररोज वाढ होत आहे असल्याने सोन्या-चांदी घेणाऱ्यांचं मन अक्षरशः हवालदिल झाल आहे.

सध्या बाजारात चांदीचा दर जीएसटी सह तब्बल एक लाख 67 हजार प्रति किलो इतका झाला आहे. म्हणजेच सामान्य माणसाला चांदीच्या दागिन्यांची किंमत आता गिळगिळीत वाढतोय. तर सोन्याच्या दर विना GST एक लाख तीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. दोन दिवसात सोन्याच्या भावात सुमारे पाचशे रुपयांची वाढ झाली असून सराफ दुकानदार म्हणत आहे की वाढ अजून काही दिवस थांबणार नाही.

सराफ बाजारातील अनुभवी व्यापाऱ्यांनी सांगितलं की, जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या किमतीतली चढउतार, तसेच मध्यपूर्व वाढलेला तणाव हे सगळं घटक या वाढीमागे आहेत. त्यात सनसुदीचा काळ असल्याने मागणी प्रचंड वाढत आहे. लोक दिवाळीपूर्वी घेऊया या विचाराने खरीद करीत आहेत, त्याचमुळे दरांमध्ये अजून वाढ झाली आहे.

अनेक लोकांना सोन खरेदी करायचं होतं पण आता दर वाढल्याने लोकांमध्ये थोडासा थांबायलाच हवं. काहीजण म्हणतात दिवाळीपूर्वी थोडा दर खाली येईल का? पण बाजाराची दिशा पाहता तसं काही संकेत नाहीत. उलट, दिवाळीत अजून दर वाढतील असा अंदाज सराफ व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अशा परिस्थितीमध्ये सोन्या चांदी घेऊ पाहणाऱ्या ग्राहकांना सध्या बाजारावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण भाव जर असेच वाढत राहिले तर छोट्या मोठ्या कुटुंबांना सणासुदीच्या खरेदीसाठी खिशायावर जड जाणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!