पोस्ट ऑफिस ची नाद खुळा योजना, दर महिन्याला देणार ₹6000 रुपये, गुंतवणूक कशी करणार?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme | दिवाळीचा मोठा सण, लक्ष्मीपूजन, याची वर्षभर आपण वाट पाहत असतो. वर्षातून येणारा सर्वात मोठा सण हा दिवाळी सण आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी, गुंतवणूक अशा गोष्टी आपण करत असतो. तुम्ही देखील या दिवाळीनिमित्त काही मोठा निर्णय व गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे कारण आता पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक मोठ्या योजना राबवल्या जातात. यामध्ये मंथली इन्कम स्कीम, सेविंग स्कीम तसेच वयोवृद्धांसाठी देखील योजना आहेत. Post Office Scheme

सध्या तुम्ही विचार करत असाल म्युच्युअल फंड शेअर मार्केट यामध्ये गुंतवणूक करण्याचा नाहीतर कुठेतरी बँकेमध्ये एफडी करण्याचा. परंतु या वर्षांमध्ये आरबीआय कडून RBI रेपो रेटमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे. यामुळे बँकांनी फिक्स डिपॉझिट चे व्याजदर कमी केलेले आहेत. तसेच शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड यामध्ये देखील चढउतारा आहेत आणि इथे गुंतवणूक करून तुम्ही जोखीम स्वीकारत आहात. तर याचा फटका तुम्हाला नक्कीच बसणार आहे परंतु गुंतवणूकदाराने सुरक्षित आणि हमखास परतावासाठी पोस्ट ऑफिस बचत योजनांना प्राधान्य दिलं आहे.

बँकेच्या फिक्स डिपॉझिट योजने मधून ग्राहकांना आकर्षित असे परतावा मिळत नसल्याचा समोर आलेला आहे. त्यामुळे अनेक जण पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये बचत करत आहेत. दरम्यान गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिस बचत योजनेत गुंतवणूक करायच आहे तर त्यांच्यासाठी मंथली इन्कम स्कीम हा सर्वात मोठा आणि बेस्ट पर्याय आहे.

परंतु यामध्ये कशी गुंतवणूक करणार? याचा प्रश्न जर तुमच्यासमोर उपस्थित आला असेल तर तुम्हाला यामध्ये एक रक्कम पैसे गुंतवावे लागतात. त्यानंतर मग दर महिन्याला एक फिक्स व्याजदर तुम्हाला मिळतं. महत्वाची म्हणजे या योजनेत गुंतवणूकदार त्याच्या जोडीदारासोबत म्हणजे जॉईंट अकाउंट करून गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे या दिवाळीत जर तुम्हाला गुंतवण करायचे असेल तर पोस्ट ऑफिस ची मंथली इन्कम स्कीम योजना खूपच फायदेशीर ठरणार आहे.

प्रत्येक महिन्याला मिळणार ₹6000 रुपयांचे व्याज?

जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करताय तर सर्वात प्रथम काही नियम व अटी जाणून घ्या या योजनेत गुंतवणूक केल्यावरती या योजनेचा कालावधी पाच वर्षाचा असतो. या योजनेत एकदा गुंतवणूक केली की दर महिन्याला फिक्स व्याज मिळतं. तर या योजनेमध्ये तुम्ही जॉइंट अकाउट सिंगल अकाउंट उघडून गुंतवणूक करू शकता. सिंगल अकाउंट ओपन केलं तर गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नऊ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते.

पण जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत जॉईंट अकाउंट खोललं तर तुम्हाला अधिक गुंतवणूक करता येते. यामध्ये जॉईंट अकाउंट धारकांना 15 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते. अर्थात तुम्ही तुमच्या पत्नीसोबत किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसोबत या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. बरं तुम्ही विचार करत असाल या योजनेमध्ये सध्या व्याज किती मिळते तर सध्याच्या स्थितीला 4

7.4 टक्के व्याजदर मिळत आहे. जर तुम्ही बँकेचे व्याजदर यांच्याशी तुलना केली तर हे व्याजदर सध्या त्यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या योजना तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि चांगला परतावा मिळू शकता. जर या योजनेमध्ये तुम्ही जॉइंट अकाउंट करून 15 लाख रुपये गुंतवणूक केली तर दर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळणार आहे.

तसेच तुम्ही तुमच्या पत्नीसोबत किंवा इतर सदस्यांसोबत या योजनेमध्ये गुंतवणूक करून दहा लाख रुपये गुंतवले तर दर महिन्याला 6167 रुपयांचा व्याज मिळणार आहे. म्हणजे पाच वर्षाच्या काळात सदर गुंतवणूकदारांना तीन लाख 70 हजार वीस रुपये व्याज मिळणार आहे. जर खरच तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना लोकप्रिय आहे आणि परतावा देखील भरपूर आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा.

हे पण वाचा | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! तुम्हाला मिळणार 8 लाख रुपये? जाणून घ्या सविस्तर

Leave a Comment