पंजाब डक यांचा नवीन हवामान अंदाज आला रे!! येत्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात होणार अवकाळी पाऊस?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab Duck Weather Forecast | राज्यामध्ये मध्यंतरी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाने विदर्भामधील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. खरंतर मागच्या वर्षी आणि यावर्षी अवकाळी पावसाचे सत्र चालूच आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. Punjab Duck Weather Forecast

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले होते. शेतकऱ्यांचे बहरत असलेले उभे पिक मातीमोल झाले होते. तळ हाताच्या फोडा सारखे जपून देखील शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी मोठे अडचणी सापडलेला होता. या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

शासन निर्णय व शेती विषयक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच 2024 या वर्षांमध्ये देखील सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली. आणि फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी देखील अवकाळी पावसाने विदर्भामधील मका गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

Also Read This | शेती विषयक व हवामान अंदाज माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच या चालू महिन्याच्या सुरुवातीला देखील महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये 16 ते 20 मार्च पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता तसेच काही विविध भागांमध्ये पाऊस देखील पाहायला मिळालेला आहे. राज्यातील मराठवाडा विदर्भ या भागामध्ये पावसाची सावट दिसत होते. तसेच भारतीय हवामान विभागाने पोचवलेल्या अंदाजानुसार काही भागांमध्ये गारपीट देखील पाहायला मिळाली.

अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी एक मोठे भाष्य केले आहे. ते म्हणजे येथे आगामी काळामध्ये राज्यामध्ये काही भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस होणार आहे.

मध्यंतरी देखील पंजाबराव यांनी असेच एक हवामान अंदाज वर्तवला होता तसेच राज्यांमध्ये पाऊस देखील झालेला आहे. यामुळे पुन्हा एकदा पंजाबराव यांनी हवामान अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे. पंजाबराव यांनी दिलेली माहिती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पंजाबराव यांनी दिली महत्वाची माहिती Weather Forecast

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र मध्ये येत्या दहा दिवस म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र इथे देखील हवामान कोरडे राहणार आहे परंतु काही ठिकाणी ढगाळ हवामान दिसू शकते.

तसेच मराठवाडा व विदर्भ या विभागाबद्दल सांगायचं झाल्यास इथे दहा दिवस हवामान कोरडे राहणार आहे. तसेच या भागामध्ये कुठेही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची कुठलीही कारण नाही.

तसेच मराठवाड्यातील आणि विदर्भामधील काही भागांमध्ये ढगाळ हवामान खायला मिळू शकते. तसेच पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या भागामध्ये तापमान 40 डिग्री सेल्सिअस पारा जाणार असल्याचा अंदाज त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!