‘या’ ३ राशींना मिळणार अफाट संपत्ती, जमिनखरेदी आणि मान-सन्मान!ग्रहांचा सेनापती मंगळ करणार नक्षत्र परिवर्तन


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

rashi bhavishya today marathi | २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.५० वाजता एक महत्त्वाचा आकाशीय क्षण घडणार आहे. मंगळ ग्रह सूर्याच्या उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे संपूर्ण राशीचक्रावर परिणाम होणार आहे. पण विशेषतः ३ राशींसाठी ही वेळ एक पर्वणी ठरणार आहे. हे नक्षत्र परिवर्तन १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रभावी राहील. या काळात मंगळाचा शुभ प्रभाव काही लोकांच्या नशिबात धन, संपत्ती, मान-सन्मान आणि कौटुंबिक आनंद घेऊन येणार आहे.rashi bhavishya today marathi

हे पण वाचा | Horoscope Astrology : या राशींचे दिवस बदलणार! नशीबाची मिळणार सात, पैसा आणि यश दोन्हीही मिळणार

सिंह राशी 

सिंह राशीच्या लोकांसाठी हे मंगळ गोचर अत्यंत शुभ ठरेल. आपल्या राशीचा स्वामी सूर्य आणि त्याच्या नक्षत्रात मंगळाचे आगमन म्हणजे एक राजयोगच म्हणावा लागेल. या काळात जमीन, घर, फ्लॅट यासारख्या स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना उत्तम संधी मिळू शकते. शेतकरी बांधवांसाठीही शेतीसाठी जमीन घेण्याची ही योग्य वेळ आहे. घरात शांतता, प्रेम आणि समाधान यांचं वातावरण राहील. जुने भांडणं मिटतील आणि आपुलकी वाढेल. आर्थिक स्थैर्य निर्माण होईल आणि खर्चांवर नियंत्रण राहील.

तूळ राशी 

तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळाचं उत्तराफाल्गुनी नक्षत्रातील भ्रमण एक जबरदस्त टर्निंग पॉईंट ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची कामगिरी पूर्ण होईल. वरिष्ठांचा विश्वास जिंकल्याने पदोन्नतीची शक्यता निर्माण होईल. काही जणांना नवीन नोकरीचे प्रस्तावही मिळू शकतात. पगारवाढ किंवा बोनससारखे फायदे मिळतील. समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. काही जणांना प्रतिष्ठित मंचावर बोलावणं येऊ शकतं. आत्मविश्वास वाढेल आणि आपल्याला पूर्वी न मिळालेल्या संधी सहज मिळू लागतील.

हे पण वाचा | ‘या’ 5 राशींसाठी आजचा दिवस ठरणार सुवर्णसंधीचा, तुमची राशी यात आहे का?

वृश्चिक राशी 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तर मंगळ गोचर एकदम सोन्याची संधी घेऊन आलेलं आहे. तुमचा राशी स्वामीच मंगळ असल्यामुळे या काळात कमी प्रयत्नात मोठं यश मिळेल. काही वेळा वाटेल की, “आपण काही विशेष केलं नाही तरी नशीब आपल्याकडं झुकलंय!” आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ खूप फायदेशीर असेल. विशेषतः जे व्यवसाय करत आहेत, त्यांना मोठ्या नफ्याच्या डील्स मिळू शकतात. धार्मिक कार्यात रस वाढेल. कुटुंबातही सुसंवाद राहील. लहान सहली, मंदिरभेटी, सामाजिक कार्यक्रम यात सहभागी होऊन मनःशांती अनुभवता येईल.

अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment