Ration card eKYC deadline | 31 जुलै ही शेवटची तारीख आहे होय, जर तुमचं रेशन कार्ड आहे आणि अजून ई-केवायसी केली नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आता सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की, 31 जुलैनंतर ई-केवायसी न केलेल्या कार्डधारकांना रेशन मिळणार नाही. इतकंच नाही तर त्यांचं रेशन कार्ड निष्क्रिय होणार आहे.Ration card eKYC deadline
हे पण वाचा | मोठी खुशखबर! महिलांना मिळणार रेशन कार्ड वर मोफत साडी? कधी मिळणार
जिल्ह्यात अजूनही 2 लाख 81 हजार 48 रेशन कार्डधारक ई-केवायसीपासून वंचित आहेत. हे सर्व लोक जर लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करत नाहीत, तर त्यांना येणाऱ्या काळात धान्य, साखर, तांदूळ याचा लाभ मिळणार नाही.
सरकारचा स्पष्ट इशारा “ई-केवायसी नाही, तर रेशन नाही!”
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने ई-केवायसीबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक रेशन कार्डधारकाने आधारशी लिंक असलेली ई-केवायसी पूर्ण करणे बांधनकारक आहे.
जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला महिन्याच्या राशनपासून वंचित राहावं लागेल. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे वेळ हातून जाऊ द्या नका.
“माझं काय चुकलं?”, असं विचारायची वेळ येऊ देऊ नका…
काही वेळा अशी परिस्थिती उद्भवते की एखादा लाभार्थी मयत झालेला असतो, लग्नानंतर स्थलांतरित झालेला असतो किंवा कामाच्या निमित्ताने दुसऱ्या गावी गेलेला असतो. अशा सर्व बाबींची माहिती रास्तभाव दुकानावर द्यावी लागेल. अन्यथा त्यांच्यामुळे पूर्ण कुटुंबाचं रेशन अडचणीत येऊ शकतं.
हे पण वाचा | पुढील 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता: ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी…
ई-केवायसी कशी करावी?
सरकारने यासाठी एक अधिकृत अॅप आणि मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
तुम्ही दोनपैकी कोणताही मार्ग वापरू शकता:
1. मोबाईल अॅपद्वारे ई-केवायसी: सरकारमान्य अॅप डाऊनलोड करा आणि आधारकार्डच्या सहाय्याने फिंगरप्रिंट पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करा.
2. जवळच्या रेशन दुकानावर जाऊन करा ई-केवायसी: फक्त आधारकार्ड आणि रेशन कार्ड घेऊन जा. तिथेच तुमचं फिंगरप्रिंट घेऊन ई-केवायसी पूर्ण केली जाईल.
लक्षात ठेवा यासाठी कोणतेही इतर कागदपत्र लागत नाहीत.
आज ना उद्या आपण सरकारी योजनांवर अवलंबून असतोच शिधापत्रिका म्हणजे आपल्या हातातला शंभर टक्के खात्रीचा पुरवठा.
पण जर आपण थोड्या निष्काळजीपणामुळे ही संधी गमावली, तर पुन्हा धावपळ आणि खोट्या तक्रारींचा फेऱ्यात अडकावं लागेल.
म्हणूनच 31 जुलैपूर्वी ई-केवायसी करा.
जगण्यासाठी लागणाऱ्या गरजेच्या गोष्टींचा मार्गच जर बंद झाला, तर बाकी काही अर्थ उरत नाही. तुमचं कुटुंब तुमच्याकडे आशेने पाहतं त्यांचा हक्काचा धान्याचा कोठा चालू राहावा यासाठी एक छोटं पाऊल आजच उचला.
Disclaimer:
वरील लेख केवळ माहितीपर उद्देशाने लिहिण्यात आला आहे. रेशन कार्ड व ई-केवायसी प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती व खात्रीसाठी आपल्या स्थानिक शिधावाटप कार्यालयाशी, संबंधित रेशन दुकानदाराशी किंवा अधिकृत शासकीय वेबसाईटवर संपर्क साधावा. लेखातील माहितीमध्ये काही बदल झाल्यास त्याची जबाबदारी लेखकाची अथवा प्रकाशकाची नाही. वाचकांनी स्वतः पडताळणी करून पुढील पावले उचलावीत.