Ration Card Online: आपल्या देशात रेशन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्रे बनले आहे. असे अनेक गोरगरीब कुटुंब आहेत जे रोज दोन वेळेच्या जेवणासाठी संघर्ष करत आहेत. अशावेळी गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सरकारकडून दिले जाणारे धान्य मोठा आधार बनत आहे. सरकार अशा कुटुंबांना मोफत रेशन देत आहे. यातून त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न संपतो. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. पूर्वी रेशन कार्ड काढायचे असेल तर खूप अवघड काम होतं. कारण त्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागायचा, त्यानंतर त्यात काही चुका आढळल्यानंतर पुन्हा ती प्रक्रिया करायची ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास खूप प्रतीक्षा करावी लागायची. पण आता काळ बदलला आहे डिजिटल इंडिया च्या युगात ही प्रक्रिया सरकारने अगदी सोपी आणि ऑनलाइन केली आहे.
मोबाईलवरच करता येणार संपूर्ण प्रक्रिया
आता नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला शासकीय कार्यालयाच्या चकरा मारायची गरज भासणार नाही. केंद्र सरकारने नागरिकांसाठी UMANG (unified mobile application for new age governance) या मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकतात. हे मोबाईल ॲप तुम्ही कोणत्याही गुगल प्ले स्टोअर वर किंवा ॲपल स्टोअर वर डाऊनलोड करू शकतात. Ration Card Online
ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा. त्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या पर्यायामध्ये रेशन कार्ड सर्विसेस हा पर्याय निवडा. इथून तुम्ही नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता. जुन्या रेशन कार्ड मध्ये बदल देखील करू शकतात. त्याचबरोबर रेशन कार्ड हरलेले असेल तर डुबलीकेट प्रत देखील मिळवू शकतात. त्याचबरोबर नवीन मेंबर ऍड करायचा असेल तर ते देखील तुम्ही ह्या ॲपच्या मदतीने करू शकता. त्यामुळे तुम्हाला रेशन कार्ड मधील कोणत्याही अपडेट करायचे असेल तर सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
सरकारच्या या ॲपच्या मदतीने आता सर्वसामान्य नागरिक घरबसल्या सरकारी सेवेंचा लाभ घेऊ शकतात. कार्यालयाच्या रांगा, दलालाचे कमिशन आणि आवश्यक त्रास यापासून मुक्तता मिळणार आहे. तुम्ही घरबसल्या अगदी काही क्लिक मध्येच हे संपूर्ण काम पूर्ण करू शकतात. यामुळे वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होणार आहे. आता कोणाचं नाव चुकून वगळलं जाणार नाही किंवा अर्ज अडकला असं सांगितलं जाणार नाही. सगळं काही ऑनलाईन वर होणार असल्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर स्टेटस तपासू शकतात.
सरकार डिजिटल भारताच्या दिशेने
भारत सरकारने मागील काही वर्षात सामान्य नागरिकांना डिजिटल सुविधा देण्यासाठी अनेक वेगवेगळी पर्याय राबवली आहेत. UMANG हे ॲप देखील त्याच दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या ॲपमुळे नागरिकांना रेशन कार्ड संबंधित सर्व सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सुलभता निर्माण झाली आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या हक्कासाठी वेळ काढणं अवघड आहे. मात्र तुम्ही घरबसल्या ही प्रक्रिया जर करू शकत असाल तर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतल्याशिवाय राहणार नाहीत. रेशन कार्ड सारख्या आवश्यक कागदपत्रासाठी देखील आता आपल्याला सरकारच्या दारात जायची गरज नाही. ही सर्व प्रक्रिया तुम्ही अगदी सहजपणे मोबाईल मधूनच करू शकता.
तालुका पुसद जिल्हा यवतमाळ राहणार गायमुख नगर माय नेम दिनेश अशोक चव्हाण मालाबाई अशोक चव्हाण