Shetkari Karjmafi 2025 | राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा काळ कोसळलेला आहे. अतिवृष्टी सारखा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं होतच नव्हतं झालं, शेतकऱ्यांना आता काय करावे ? पुढे कसे होणार? आम्ही कसे जगावे नुसता अनुदान देऊन काय होणार आमच्यावरती असणार कर्ज कस आम्ही फेडणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. राज्यातील पावसाने शेतकऱ्यांच जगणं अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकल आहे. मराठवाडा, खानदेश, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर या भागात खरीपच पिक वाहून गेलं, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी सुकलं. बँकेचे कर्जाचे वज डोक्यावर आणि त्यात सरकारकडून आलेली मदत ही केवळ नावापुरती आहे. यामुळे शेतकरी संतापले आहेत. Shetkari Karjmafi 2025
गेल्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने कर्जमाफी गाजर फक्त शेतकऱ्यांना दाखवलं. आम्ही सत्तेत आलो की कर्जमाफी देऊ असं मोठ्यानं सांगण्यात आलं. त्यामुळे पावसामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी म्हणतात पुन्हा एकदा आशेच किरण घेऊन आला आहे. कारण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्वतः कर्जमाफी बाबत मोठी अपडेट दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीमध्ये ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. माध्यमांशी त्यांनी बोलताना पष्ट सांगितले आहे की, आमच्या घोषणा पत्रात शेतकरी कर्जमाफीच आश्वासन दिल आहे. त्याची पूर्तता आम्ही करणारच. मात्र याबाबत अभ्यास सुरू आहे. वारंवार कर्जमाफी करता येत नाही. म्हणूनच यावेळी कर्जमाफी परिमाणक कारक असेल.
याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना लगेच कर्जमाफीची भेट मिळणार नाही. सरकारची समिती यावर अभ्यास करत आहे आणि त्यानंतरच अंतिम निर्णय होईल. मात्र सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचवणं गरजेचं असल्याचंही फडणवीस यांनी मान्य केलं.
शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष आधीपासूनच सरकार वरती दबाव आणत आहे. आता नाही तर कधी? असा सवालही रानात, वाड्या वस्तींवर ऐकायला येतोय. खरंतर, शेतकऱ्याला पीक गेल्यावर त्याच्या जीवाला आधार देणारी गोष्ट म्हणजे कर्जमाफीच.
फडणवीस यांच्या या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या मनात हिवाळी अधिवेशनाकडे नजर लागलेली आहे. आता येत्या नव्या अधिवेशनामध्ये हा निर्णय मार्गी लागेल का अशी शक्यता सध्या निर्माण झाले आहे. तोपर्यंत मात्र बँकेच्या हप्त्यांशी, उदरनिर्वाह निसर्गाशी झुंजत राहणार हे नक्की.
(ही माहिती प्रसारमाध्यमांवरती दिलेली आहे.)
हे पण वाचा | शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफी मिळणार? आली मोठी अपडेट समोर!