Soybean Bajar Bhav 2025 | मागच्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजार भाव योग्य प्रकारे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून निराशा दिसून येत होती. आधीच निसर्गाने सर्व हिसकावून घेतले, त्यातच उरल्या सुरलेल्या सोयाबीनला देखील योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला होता. आता हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी लक्ष्मीपूजन, या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च देखील होतो. आणि अशातच भाव कमी म्हटल्यावर शेतकऱ्यांना नक्कीच फटका बसणार परंतु सध्या बाजारातून आलेल्या अपडेट नुसार, बाजारात कुठे चढउतार दिसला नाही. मात्र, आवक घटलेली आहे. लातूर, अमरावती, उमरखेड, मेहकर, अंबाजोगाई या प्रमुख बाजारांमध्ये आज एकूण सुमारे 41 हजार क्विंटल सोयाबीनचे अहवाल झाली असून शेतकऱ्यांचे लक्ष भावावरच आहे. Soybean Bajar Bhav 2025
लातूर बाजारात आज सकाळी जवळपास 9000 क्विंटल सोयाबीन आली. येथे दर 3830 ते 4521 रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेले. मेहकर, जळकोट आणि अंबाजोगाई येथील तर उंचावले होते. तर उमरखेड आणि उमरखेड डांकी या बाजार समितीमध्ये सर्वाधिक 4,600 रुपयांचा दर नोंदवला गेला. अमरावती, पुसद, अकोला, हिंगोली, वाशिम या बाजारांमध्ये 3800 ते 4200 रुपयांच्या आसपास राहिले. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक कमी झाली असल्याने काही ठिकाणी खरेदीदार किंमत कमी ठेवत असल्याच शेतकऱ्यांचे म्हणणं आहे.
राज्यात सध्या पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी आहे. लातूर, उमरखेड, मेहकर, अंबाजोगाई येथे या जातीला सर्वाधिक भाव मिळतोय. आणि लोकल तसेच नंबर वन जातीच्या सोयाबीनला मात्र तुलनेने कमी दर मिळतोय.
शेतकऱ्यांमधून काही भावना देखील व्यक्त केला जात आहे, दर जरा जास्ती आहेत पण आवक कमी असल्याने पुढच्या आठवड्यात भाव वाढतील अशी अशा शेतकऱ्यांना आहे. तर लातूर मधील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आवक वाढली तर दर परत स्थिर होतील पण सध्या पुरवठा मर्यादित असल्याने दर टिकून आहेत.
राज्यातील काही समित्यांमध्ये दर 2700 रुपयांपर्यंत खाली गेले तर काही ठिकाणी 4600 रुपयांचा उंच आणखी दर नोंदवला गेला. सरासरी दर मात्र 3900 ते 4100 रुपयांच्या दरम्यान राहिला. अनेक शेतकरी आता नव्या हंगामाच्या तयारीत असल्याने त्यांनी जुना माल थांबवून ठेवला आहे. बाजारात स्थिरता असली तरी पुढील आठवड्यात दर वाढतील अशी शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आणि तेलबियांच्या आंतरराष्ट्रीय भावांवर ही दरवाढीचा पुढचा कल ठरणार आहे.
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १००% अनुदानावर मोफत सोयाबीन बियाणे उपलब्ध!