Soybean Market Price: महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस सोयाबीन बाजारभावाच्या दृष्टिकोनाने शांत होता. राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये सोयाबीनचा दर स्थिर राहिला असून आवक घटल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि अचानक पडणाऱ्या पावसामुळे शेतमालाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. राज्यात आज एकूण 57,369 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. दिवाळीनंतर काही दिवस मोठ्या प्रमाणात आवक होत होती मात्र मागील दोन दिवसात सुमारे 15 ते 20 टक्के आवक घटली आहे. यात आश्चर्य करणारे गोष्ट म्हणजे आवक घटून देखील दर स्थिर आहेत. राज्यात सोयाबीनला सर्वसाधारण दर 4090 रुपये प्रतिक्विंटल एवढा मिळत आहे.
लातूर अकोला जळगाव हिंगोली चिखली या बाजारात उच्च दर्जेच्या सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे पिवळ्या जातीची सोयाबीन व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागवली जात आहे. राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लातूर चिखली जिंतूर आणि निलंगा येथे या प्रकारच्या सोयाबीनला 4300 ते 4500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला आहे. चिखली बाजार समितीत आज सर्वाधिक दर 5,050 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. डॅमेज सोयाबीनला तुलनेनुसार कमी दर मिळत असला तरी व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गुणवत्ता युक्त सोयाबीनची उपलब्धता कमी असल्यामुळे पिवळ्या जातीच्या सोयाबीनला दर चांगला मिळत आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील सोयाबीन बाजार भाव
- लातूर:— लातूर बाजार समितीमध्ये 25,911 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी सरासरी दर 4,400 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
- अकोला:— अकोला बाजार समितीमध्ये 2953 क्विंटल सोयाबीनची अवक झाली असून या ठिकाणी सरासरी दर 4300 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
- चिखली:— चिखली बाजार समितीमध्ये 1380 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी आजचा सर्वात जास्त दर 5,050 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
- हिंगोली:— हिंगोली बाजार समितीमध्ये 1520 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी सरासरी दर 4125 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे.
- माजलगाव:— माजलगाव बाजार समितीमध्ये 2626 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी सरासरी दर 4125 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे.
- निलंगा:— या ठिकाणी सरासरी दर 4250 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे.
- पिंपळगाव, परतुर, देवणी:— या बाजार समितीमध्ये सरासरी दर 4200 ते 4400 प्रतिक्विंटल दरम्यान मिळाला आहे.
हवामानाचा परिणाम
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाचा परिणाम जाणवत आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन व इतर बाजारात नेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पाऊस थांबला की अचानक बाजारामध्ये आवक वाढेल आणि बाजार भाव घसरेल याची खंत व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सोयाबीनची अवक जरी वाढली तरी दर स्थिर राहू शकतात. लातूर आणि बीड परिसरातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, पिवळ्या सोयाबीनचा दर्जा आणि त्यातील तेलाचे प्रमाण चांगले असल्याने या प्रकारच्या सोयाबीनला चांगला दर मिळू शकतो. Soybean Market Price
सोयाबीनचे दर वाढू शकतात का?
सोयाबीनचं सीजन अजून पूर्णपणे संपलं नाही. शेतकऱ्याकडे अजून बराच माल शिल्लक असल्यामुळे हवामान स्थिर होताच पुढील आठवड्यात आवक पुन्हा वाढू शकते. आवक वाढली तरी दरात फारसा फरक पडेल असं काही नाही. दर पूर्वीप्रमाणेच स्थिर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या बाजार स्थिर असले तरी पाऊस उघडताच सोयाबीनची आवक आणि मागणी मोठ्या प्रमाणात सुरू होईल. ग्रामीण भागात सोयाबीन म्हणजेच शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळणे खूप आवश्यक आहे.
