ताज हॉटेलमध्ये कोल्हापुरी चप्पल घातल्यामुळे महिलेचा अपमान! व्हिडिओ होतोय तुफान वायरल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Taj Hotel video viral | सध्या सोशल मीडियावरती एक ताज हॉटेल मधील जेवायला गेलेल्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. कारण तिने कोल्हापुरी चप्पल घातली होती आणि ती मांडी घालून बसली होती. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून देशभरात चर्चा रंगल्या आहेत. Taj Hotel video viral

हा प्रकार युवर स्टोरीच्या संस्थापक श्रद्धा शर्मा यांच्याबाबत घडला. श्रद्धा यांनी स्वतः हा व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं की, मी माझ्या बहिणी सोबत दिवाळीच्या दिवशी ताज मध्ये जेवायला गेले होते. पण माझी चूक एवढीच की मी मांडी घालून बसली आणि पायात कोल्हापुरी चप्पल होती. यावरून मला सर्वांसमोर सुनावले गेले. श्रद्धा म्हणाले मी मेहनतीचे पैसे कमावलेत, बिल भरते तरी माझा अपमान का?

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

त्यांच्या या भावनिक व्हिडिओवर लाखो लोकांनी प्रतिक्रिया दिले आहेत. काहींनी ताज स्टाफ वर संताप व्यक्त केला, तर काहींनी म्हटलं की अशा ठिकाणी जाण्याचं काही नियम असतात. एका युजरने लिहिले, तुमच्याकडे बिल भरण्याचे पैसे आहेत पण शिष्टाचार नाही! तर दुसरा म्हणतो हे लोक अजूनही भारतीय संस्कृत कडे खाली पाहतात. मांडी घालून बसला हा आपल्या देशातील सन्मानाचा भाग आहे.

काहींनी श्रद्धा यांचा समर्थन करत विचारलं कसं बसायचं आणि कसं खायचं हे ठरवायचा अधिकार हॉटेलवाल्यांना कोणी दिला ? शिल्पा शेट्टी सारख्या सेलिब्रिटींना ही हाताने जेवण करणं पसंत केला आहे, मग साध्या माणसाने कोल्हापुरी चप्पल घातली म्हणून अपमान का? या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर ड्रेस कोड आणि वागणूक कोड या संकल्पनावर सवाल उपस्थित केले आहे. काहींना वाटतं आजही आपला देशात लक्झरीच्या नावाखाली वर्ग भेद जिवंत आहे. श्रद्धा शर्मा यांनी शेवटी सांगितलं माझा उद्देश वाद घालणं नाही, पण प्रत्येक महिन्याची भारतीयाला सन्मानाने वागणूक मिळावी. आपण कितीही मोठ्या ठिकाणी गेलो, ती आपली संस्कृती विसरू नये.

हे पण वाचा | बिबट्याशी भिडला कामगार! लखीमपूरमध्ये जीवघेण्या झुंजीचा थरारक व्हिडीओ व्हायरल!”

Leave a Comment