Todays Gold Price: मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळाला आहे. मात्र आज दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आज सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. दिवाळीनंतर सोन्याची मागणी काही प्रमाणात कमी झाल्यानंतर सोन्याचे दर स्वस्त होताना दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांची बाजारात गर्दी वाढली आहे. सोन्याची दुकाने उघडताच दुकानदाराकडे चौकशीसाठी नागरिक दाखल होत आहेत. सोनारांना विचारत आहेत आज काय दर आहे?
आजचे सोन्याचे दर
आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 12507 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 11,464 एवढा आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याचा दर 9380 रुपये प्रति ग्रॅम एवढा आहे. दहा ग्रॅम चा हिशोब बघितला तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,14,640 रुपये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,25,070 रुपये आणि 93,800 रुपये एवढा आहे. त्याचबरोबर चांदीचा दर देखील आज घसरला आहे. आज चांदीचा दर प्रत्येक ग्रॅम 168.90 तर प्रत्येक किलो 1,68,900 रुपये इतका आहे.
कालच्या तुलनेत किती बदल?
16 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर बारा हजार पाचशे आठ रुपये प्रति ग्राम एवढा होता म्हणजेच आज यामध्ये हलकीशी घसरण होऊन 1 रुपये प्रत्येक ग्रॅम कमी झाला आहे. तसंच 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये देखील घसरण झाली आहे. चांदणे ही कालच्या तुलनेत किंचित घसरण घेतली असून कालचा दर प्रतेक ग्रॅम 169 रुपये होता जो आज कमी होऊन 168.90 एवढा झाला आहे. Todays Gold Price
जर 14 आणि 15 नोव्हेंबर चे दर पाहिले तर सोन्याच्या किमतीत तब्बल दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 14 नोव्हेंबरला 12866 रुपये एवढा होता जो 15 नोव्हेंबरला 12703 रुपये झाला. सोन्याच्या किमतीत होणाऱ्या सातत्याच्या घसरणीमुळे बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया शहरानुसार सोन्याचे बाजार भाव.
प्रमुख शहरातील आजचे दर
| शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम चा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम चा दर |
|---|---|---|---|
| चेन्नई | ₹1,14,640 | ₹1,25,070 | ₹93,800 |
| बंगळुरु | ₹1,14,640 | ₹1,25,070 | ₹93,800 |
| पुणे | ₹1,14,640 | ₹1,25,070 | ₹93,800 |
| केरळ | ₹1,14,640 | ₹1,25,070 | ₹93,800 |
| मुंबई | ₹1,14,640 | ₹1,25,070 | ₹93,800 |
| नागपूर | ₹1,14,640 | ₹1,25,070 | ₹93,800 |
| हैद्राबाद | ₹1,14,640 | ₹1,25,070 | ₹93,800 |
| कोलकाता | ₹1,14,640 | ₹1,25,070 | ₹93,800 |
| जयपूर | ₹1,14,790 | ₹1,25,220 | ₹93,950 |
| लखनौ | ₹1,14,790 | ₹1,25,220 | ₹93,950 |
| चंदीगड | ₹1,14,790 | ₹1,25,220 | ₹93,950 |
| दिल्ली | ₹1,14,790 | ₹1,25,220 | ₹93,950 |
| नाशिक | ₹1,14,670 | ₹1,25,100 | ₹93,830 |
| सुरत | ₹1,14,690 | ₹1,25,120 | ₹93,850 |
सोन्याच्या किमतीत झालेली घसरण ग्राहकांसाठी सुवर्णसंधी मानली जात आहे. कारण तब्बल महिन्याभरानंतर सोन्याचे दर आता घसरले आहेत. लग्न सराईचा हंगाम असल्याने अनेक कुटुंब आजच सोने खरेदी करू लागले आहेत. भविष्यात सोन्याचे दर पुन्हा एकदा तेजीत येऊ शकतात. त्यामुळे सोन्याचे किमतीत झालेली घसरण लक्षात घेऊन सोने खरेदी करणे योग्य ठरू शकते.
टीप: वरील दिलेले सोन्याचे दर जीएसटी टीडीएस आणि मेकिंग चार्ज शिवाय असतात. त्यामुळे प्रत्यक्षात सोने खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर आम्ही दिलेल्या सोन्याच्या किमतीत आणि त्यांच्या किमतीत फरक आढळतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्स कडे चौकशी करा.