Viral Video: सोशल मीडियावर रोज काही ना काही भन्नाट व्हायरल होत असतं. कधी लहान मुलांचे गोड व्हिडिओ लोकांच्या मनाला भिडतात तर कधी प्राण्यांचे चित्रविचित्र कृत्य माणसांना थक्क करतात. मात्र यावेळी जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही. कारण या व्हिडिओत जंगलाचा राजा सिंहाला भिडायला कोणी शिकारी नसून एक वृद्ध महिला धाडस करताना दिसत आहे. तुम्हालाही हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल मात्र आज्जींना सिंहासमोर काठी घेऊन अशी उभी राहिली की सिंहाने आज्जीला पाहून पळ काढला. हा सर्व प्रकार एवढा मजेशीर आहे की सर्व लोक मोठ्याने हसू लागले.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नेमकं काय घडलं?
इंस्टाग्राम वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक रस्ता दिसतो. काही लोक आणि एक ट्रक रस्त्याच्या कडेला थांबलेली दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे हावभाव दिसत आहेत. कारण काही अंतरावर रस्त्याच्या साईडला एक सिंह लपलेला असतो. सिंहाचं नाव ऐकलं तरी अनेक जणांना खूप जास्त भीती वाटते. अशा अनेक लोक सिंहाच्या भीतीने गप्प उभे राहिले आहेत. पण अचानक या सर्व भीतीच्या वातावरणात एक जबरदस्त घटना घडते. एक आज्जी काठी घेऊन सिंहाकडे चालत जाते. तिच्या चेहऱ्यावर भीती नसल्यामुळे ती आज्जी थेट सिंहाकडे रागाने चालत जाऊन काठी उघडते. आणि चक्क आज्जीला घाबरून सिंह जंगलाकडे धाव घेतो. हे दृश्य पाहून लोक थक्क होतात आणि सगळ्यांनाच हसू येते.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व्हिडिओवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया
हा व्हायरल व्हिडिओ अगदी काही क्षणाचा असला तरी सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी आपली प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. एका युजरने लिहिले आहे की, वा आज्जी वा चक्क सिंहाला सुद्धा संस्कार शिकवले तुम्ही, तर दुसरा एक युजर म्हणत आहे की आज्जी खरी जगदंबा आहात तुम्ही, त्याबरोबरच काही युजरने गंमत म्हणून लिहिला आहे की, आज्जीचं सिंह जातीमध्ये उठणं बसणं असेल बहुतेक, अशा अनेक मजेदार कमेंट या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आल्या आहेत. Viral Video
या व्हिडिओमध्ये दिसणारे दृश्य जितके मजेदार वाटते तितकेच ते वेगळा संदेश देखील देत आहे. धैर्य हे वयावर अवलंबून नसतं तर मनाच्या निर्धारावर अवलंबून असतं. ही आज्जी प्रत्येकांना सांगून गेली की, किती फक्त मनात असते ज्या दिवशी ती भीती मनातून काढून टाकतात त्या दिवशी सिंह सुद्धा तुमच्यासमोर नतमस्तक होईल. हा व्हिडिओ मनोरंजनासाठी शेअर करण्यात आला असला तरी या व्हिडिओ मधून प्रेक्षकांना शिकावे असे खूप काही आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवायला हवं की जंगलातील प्राण्यांची असा धोका घेणे धोकादायक ठरू शकते. हा प्रसंग खरोखर करणे योग्य नाही मात्र आज्जीच्या धाडसाला प्रत्येकाने सलाम करायला हवा. जंगलाचा राजा जरी सिंह असला तरी मनात भीती नसल्यामुळे त्या सिंहालाही घाबरून आज्जीनेच लावलं.
