Viral Video: आज-काल सोशल मीडिया प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं बनलं आहे. सोशल मीडियावर रोज वेगवेगळी व्हिडिओ व्हायरल होत असतात. मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळ्यांना सोशल मीडियाचे वेड लागले आहे. अगदी लहान लहान मुलं देखील मोबाईलवर व्हिडिओ बनवून पोस्ट करत आहेत. गाणी गाणं भारी डान्स करणे आणि आपलं कौशल्य सोशल मीडियावर सादर करणे प्रत्येकालाच आवडते. अनेक वेळा चिमुकल्या मुलांचे निरागस व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अशाच एक गोंडस मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. ती अजून व्यवस्थित बोलतही नाही, मात्र तिचं बोलणं आणि आत्मविश्वास बाबत कोणाचाही मन प्रसन्न होईल. या चिमुकलीने तब्बल 65 वर्षांपूर्वीचा बरखा चित्रपटातील सुप्रसिद्ध गाणं तडपाओगे… तडपा लो… या गाण्यावर गाणं गायला आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्या मुलीचा गोड आवाज आणि तिचे गाणे सोबत असणारे क्युट एक्सप्रेशन पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. गंमत म्हणजे ती मुलगी तडपालो ऐवजी तळपालम असं म्हणत आहे. आणि तिचा हाच गोड चुकीचा उच्चार नेटकऱ्यांना आवडला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहानगी मुलगी पांढऱ्या रंगाचा खोक घालून गाणं गाताना दिसत आहे. कपाळावर लाल टिकली चेहऱ्यावर निरागस हसू आणि ओठावर जुन्या गाण्याची शब्द हे सगळं पाहून कोणालाही कौतुक वाटेल. तिच्या गाण्याबरोबरचे हवा भाव इतके सुंदर आहेत की तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहू वाटेल.
हे पण वाचा| आई ही भाजी कोण खातं मम्मा?” चिमुकलीने धरला बिर्याणीचा हट्ट; तिचं बोलणं ऐकून नेटकरीही पोट धरून हसले!
इतक्या लहान वयात तिचा आत्मविश्वास आणि तिचा गोड आवाज खूपच भारी वाटत आहे. अनेक जणांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या चिमुकलीचं तळपालम आता आमच्या घरात रोज वाजतंय. अशा अनेक जणांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्या आहेत. काहीच वेळात या व्हिडिओला हजारो लाईक आणि शेअर मिळाल्या आहेत. काही जणांनी तर हसत लिहिलंय की, जुने गाणे ही आता तिच्या गोड आवाजामुळे भारी वाटू लागला आहे. Viral Video
लहान मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळच तेज आणि सौंदर्य असतं. ती निष्पाप गोडी, चेहऱ्यावरील निरागसपणा, अव्यक्त शब्द आणि आत्मविश्वास हेच या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मीडियावर दररोज शेकडो व्हिडिओ व्हायरल होतात पण यातील काहीच असे व्हिडिओ असतात जे प्रत्येकाच्या हृदयावर राज करतात. ही चिमुकली जे गाणं म्हणत आहे ते पाहून नेटकरी खूपच खुश झाले आहेत. या छोट्या व्हिडिओतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. गोड बोलणं आणि निरागस हास्य हेच खरं जग जिंकण्याचा शस्त्र आहे.