Viral video of snake: अरे बापरे साप! असं कोणी म्हटलं की अंगावर काटाच उभा राहतो. आजूबाजूचे लोक दोन पावलं मागे हटतात. सापाची भीती प्रत्येकाच्याच मनात निर्माण होते. मात्र या भयानक प्राण्याची काही लोक असे वागतात जणू काही ते एखादं खेळणंच आहे. सोशल मीडियावर असे भयानक व्हिडिओ अनेक व्हायरल होतात. ज्यामध्ये काही लोक सापाशी खेळ करताना दिसतात. त्यातील काही व्हिडिओ अगदी रोमांचक असतात तर काही व्हिडिओ अंगावर काटा उभा करतात. असाच एक जबरदस्त सापाचा आणि एक साडी घातलेल्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक साडी नेसलेली तरुणी शेतातील अजगराला पकडताच तो अजगर तिच्यावर हल्ला करतो.
या व्हिडिओमधील प्रसंग ग्रामीण भागातील असल्याचे दिसत आहे. शेतात काम करणाऱ्या लोकांना अचानक झुडपामध्ये काहीतरी हालचाल जाणवते. जवळ जाऊन पाहिलं तर त्यामध्ये साप नव्हतं मोठा अजगर होता. स्थानिक लोक भीतीने मागे सरकले. त्यातील काही लोक वनविभागाला कळवा तर काहीजण साप दिसला म्हणून थरथर कापत होते. मात्र त्या सर्व गर्दीतून एक तरुणी पुढे आली. तिने शांतपणे साडीचा पदर सावरला आणि एकदम धाडसान अजगराच्या दिशेने पाऊल टाकलं. Viral video of snake
हे पण वाचा| दारूच्या नशेत कोण काय करीन सांगता येत नाही! पठ्ठ्या चक्क वाघाला मांजर समजून दारू पाजू लागला; भन्नाट व्हिडिओ व्हायरल..
साडेतीन तरुणीच जबरदस्त धाडस
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती तरुणी अजगराची शेपटी अलगद पकडण्याचा प्रयत्न करते. हा सर्व प्रसंग पाहणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके मोठमोठ्याने वाढतात. अजगर वळवळ जाणवतात काही क्षणात तो त्या तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र तरीही ती मुलगी न घाबरता पुन्हा धाडस करते. ती पूर्ण ताकदीने अजगराला झुडपातून बाहेर ओढते. अजगर अनेक वेळा त्या तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते मात्र त्या तरुणीचा संयम आणि आत्मविश्वास पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित होतात.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सोशल मीडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्या तरुण मुलीच्या धाडसाला प्रत्येक जणांनी कौतुक केले आहे. असा धाडसाचं उदाहरण फारच कमी पाहायला मिळतं. अनेक पुरुषांनी इतकं धैर्य धरलं पाहिजे. हीच खरी महिला सक्षमीकरणाची व्याख्या आहे. अशा अनेक कमेंट या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आल्या आहेत. काहीजणांनी तर त्या मुलीच्या धाडसासाठी रियल लाईफ नागिन अशी उपाधीही दिली आहे. त्याचबरोबर काही जणांनी अशा प्रसंगी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देखील दिला आहे.
 
					 
		