Women and Child Development Department Recruitment : महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला व बालविकास विभागात मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेली ही भरती प्रक्रिया अखेर जाहीर करण्यात आली असून हजारो कर्मचाऱ्यांना पद निर्मितीची व प्रगतीची संधी मिळणार आहे. राज्यभरात अनेकजण या विभागात काम करीत असून आता त्यांच्यासाठी नव्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया करण्याची दारे खुले करण्यात आलेली आहे. Women and Child Development Department Recruitment
ही भरती महिला व बाल विकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत गट-ब (राजपत्रित) संवर्गातील विविध पदांसाठी होणार आहे. ही संधी मात्र सामान्य उमेदवारांसाठी नसून – फक्त संबंधित विभागातील पात्र कर्मचाऱ्यांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.
कोणत्या पदांसाठी भरती होणार?
या भरतीत अधिक्षक/निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी (गट-ब राजपत्रित) आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) या पदांचा समावेश आहे.
या सर्व पदांसाठी वेतनश्रेणी आकर्षक असून पगार मॅट्रिक्स 9-15, म्हणजेच ₹41,800 ते ₹1,32,300 + महागाई भत्ता व इतर भत्ते मिळणार आहेत. ही नेमणूक महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात केली जाऊ शकते.
परीक्षा प्रक्रिया कशी असेल?
भरती प्रक्रियेत दोन टप्पे असतील
लेखी परीक्षा (400 गुण)
मुलाखत (50 गुण)
अंतिम निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील एकत्रित गुणांच्या आधारे होईल. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार असून चुकीच्या उत्तरावर 25 टक्के नकारात्मक गुण वजा केले जातील. परीक्षा फक्त नवी मुंबई येथे होणार आहे.
पात्रता काय लागेल?
अर्जदार महिला व बाल विकास विभाग किंवा ग्रामविकास विभागातील संबधित संवर्गातील असावा.
1 जानेवारी 2025 पर्यंत सात वर्षांची सलग नियमित सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे.
संगणक प्रमाणपत्र तसेच मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क
– सामान्य प्रवर्ग – ₹719
– मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग – ₹449
– आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – शासन आदेशानुसार सवलत.
परीक्षा विषय व स्वरूप
पेपर 1 – सामान्य ज्ञान, शासनाशी संबंधित कायदे, विभागीय ज्ञान (200 गुण)
पेपर 2 – पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान (200 गुण)
यानंतर 50 गुणांची मुलाखत घेण्यात येईल.
निकाल आणि पुढची प्रक्रिया
परीक्षेनंतर आयोगाच्या संकेतस्थळावर गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची शिफारस व प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया राबवली जाईल.
ग्रामीण उमेदवारांसाठी मोठी संधी!
राज्यभरातील अनेक महिला व बाल विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी गेली अनेक वर्षे पदोन्नतीची वाट पाहत होते. अखेर या भरतीमुळे त्यांच्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. योग्य तयारी केल्यास ही संधी करिअरला नवी दिशा देऊ शकते.
महत्त्वाचं म्हणजे, ही भरती केवळ एक रोजगार संधी नाही, तर राज्यातील बालकं, महिला आणि ग्रामीण समाजासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक जबाबदारी मिळवण्याचं एक व्यासपीठ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळ wcd.nic.in वर जाऊन सविस्तर जाहिरात पाहावी आणि वेळेत अर्ज सादर करावा.