Gold Rate Today | सोन्या चांदीच्या बाजारातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. काही दिवसांपूर्वी विक्रमी पातळी गाठलेला दर आता जोरात खाली घसरत आहे. सोन तब्बल तेरा हजार रुपयांनी स्वस्त झालं तर चांदी थेट 29 हजार रुपयांनी कोसळी आहे. दिवाळी संपतात लग्नसराईचा हंगाम सुरू होतो या घसरणीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर काल सोन्या तब्बल 3,000 रुपयांची घसरण दिसली, तर चांदीत तितकीच मोठी पडझड झाली. काही दिवसांपूर्वी 1.32 लाख रुपये प्रति दहा ग्राम च्या आसपास आलेलं सोन आता 1.18 लाखांवर आलंय. तर चांदीचा दर 1.70 लाखांवरून थेट 1.41 लाखांवर आला आहे. म्हणजेच सोन्या चांदीच्या भावाने बाजारात अक्षरश धक्का दिला आहे. Gold Rate Today
सध्या बाजारात चर्चा रंगली आहे कि दर अजून खाली येतील का? सध्या याचे उत्तर कोणाकडेच नाही पण जागतिक संकेत अजून कमजोर दिसतात. अमेरिका चीन व्यापार तणाव कमी झालाय, डॉलर मजबूत झालाय आणि त्यामुळे मौल्यवान धातूंवर विक्रीचा दबाव वाढलाय.
या सर्व परिस्थितीवर तज्ञ सांगतात की गेल्या दोन महिन्यांपासून सतत चढ-उतर होते. व्यापाऱ्यांनी आता नफा वसुली सुरू केली आहे. शिवाय डॉलर मजबूत झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्याकडून पैसे काढले आहेत.
दरम्यान गुंतवणूकदारांचं लक्ष आता अमेरिकन फेडरल रिझर्व आणि इतर केंद्रीय बँकांच्या व्याजदर कपातीच्या निर्णयावर आहे. जर व्याजदर कमी झाला तर सोन पुन्हा वाढू शकता, पण कपात अपेक्षा पेक्षा कमी झाल्यास सोन्याचे भाव अजून खाली येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सध्या सोन्याचा बाजारभाव 1.18 लाखानी चांदी एक लाख 41 हजार रुपयांवर आली आहे, तर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घ्यावी. कारण अजून काही दिवसात दर आणखी खाली आले तर मोठा फटका बसू शकतो. परंतु लग्नानिमित्त सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे तुमच्यासाठी हा मोठा गोल्डन चान्स असू शकतो.
(Disclaimer : वरील दिलेले दर हे अंदाजे आहेत योग्य दर जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.)
 
					 
		