24k Gold Price In India: सोन्याच्या किमतीमध्ये आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठा बदल झाला आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आज मौल्यवान धातूच्या किमती 1000 रुपयांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर सध्या भारतात लग्नसराई सुरू असल्यामुळे सोने-चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोन्याच्या दुकानांमध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठे गर्दी दिसत आहे. त्यामुळे सोन्याच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत.
सोने चांदीचे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडीवर अवलंबून असतात. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यामुळे देखील सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचबरोबर बाजारात सोन्या-चांदीची मागणी किती प्रमाणात आहे यावर देखील त्याची किंमत अवलंबून असते. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहेत हे जाणून घेणे खूपच महत्त्वाचे असते. सोन्यामध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने देखील सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. वाढत्या मागणीमुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत.
सोने चांदीच्या दागिन्यांना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे सध्या सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. आज सोन्याच्या किमती प्रति 100 ग्रॅम मागे एक हजार रुपयांनी वाढल्या आहेत. यामुळे सहाजिक ग्राहकांचा हात सोने खरेदीसाठी आखडला जाणार आहे. सोन्याचे किमती सोबतच चांदीच्या किमती देखील बदलल्या आहेत. मात्र चांदीच्या किमतीमध्ये जास्त मोठा बदल झालेला नाही. आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याच्या किमती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा | 9 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 19 व्या हप्त्याचे 2,000 रुपये
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. त्याचबरोबर आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80550 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाणारे नागपूर शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80550 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87870 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. महाराष्ट्रभर सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाणारे जळगाव शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87870 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
महाराष्ट्रातील ठाणे शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 550 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 80550 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद केली आहे.
हे पण वाचा | मोठी खुशखबर! महिलांना मिळणार रेशन कार्ड वर मोफत साडी? कधी मिळणार
चांदीची किंमत किती आहे?
काल चांदीची किंमत एक लाख पाचशे रुपये प्रति किलो एवढी होती. मात्र आज 24 फेब्रुवारी रोजी चांदीची किंमत प्रति किलोमागे शंभर रुपयांनी घसरली असून आज चांदीची किंमत एक लाख 400 रुपये प्रति किलो एवढी झाली आहे. 24k Gold Price In India
शुद्ध सोने कसे ओळखावे?
सोने खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर अनेक वेळा आपल्याला प्रश्न पडला असेल की शुद्ध सोने कसे ओळखावे? शुद्ध सोने ओळखण्यासाठी सोन्यावर त्याच्या शुद्धतेनुसार हॉलमार्क दिलेले असतात. 24 कॅरेट सोन्यावर 99.9% असे हॉलमार्क लिहिलेले असते. सोन्याचे दागिने खरेदी करताना हॉलमार्क तपासणी आवश्यक आहे. हॉलमार्क हे भारत सरकारच्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस द्वारे प्रमाणित केलेले आहेत. हॉलमार्क वर कॅरेट मध्ये सोन्याची शुद्धता दर्शवलेली असते.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
2 thoughts on “आज पुन्हा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! पहा आजचे सोन्याचे नवीन दर..”