PM Kusum Solar Yojana: पीएम कुसुम सोलार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज महावितरण कडे ट्रान्सफर झालेला आहे. अशा अर्जासाठी महत्त्वाची अपडेट आली आहे. पीएम कुसुम सोलार योजना अंतर्गत ज्या अर्जांना मंजुरी मिळाली आहे. मात्र अजूनही अर्जाचे पेमेंट झालेले नाही, अशा अर्जांना आता शेवटची संधी देण्यात आली आहे.
अशा लाभार्थी शेतकऱ्यांनी शेवटच्या सात दिवसात जर पैसे भरले नाही तर त्यांच्या अर्ज कायमचे बाद होण्याची शक्यता आहे. याबाबत आता एक अपडेट समोर आली आहे. अशा शेतकऱ्यांना मेडा कडून मोबाईल नंबर वर मेसेज पाठवण्यात आला आहे. PM Kusum Solar Yojana
हे पण वाचा | आज पुन्हा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! पहा आजचे सोन्याचे नवीन दर..
यामध्ये लिहिलेले आहे की, प्रिय शेतकऱ्यांनो लाभार्थ्यांचे नाव कुसुम योजना अंतर्गत आपण केलेल्या अर्जाची निवड झाली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास यापूर्वी वारंवार सूचना देऊन देखील आपल्याकडून लाभ घेण्यासाठी कोणतेही हालचाल प्राप्त झाली नाही. आपण मुदतीमध्ये लाभार्थींना भरल्यास आपला लाभार्थींचा भरण्याचा पर्याय कायमचा बंद करून आपला अर्ज अपूर्ण आहे असे समजून पुढील लाभार्थ्यांच्या अर्जांचा विचार करण्यात येईल. असे मेसेज मध्ये सांगण्यात येत आहे.
जर तुम्हाला पैसे भरायचे असतील तर…
जर तुम्हाला मोबाईलद्वारे या योजनेचे पैसे भरायचे असतील तर कसे भरावे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
- सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन मेडा बेनिफिशियरी हे एप्लीकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचे आहे.
- यानंतर हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपण मेडाकडे दिलेल्या मोबाईल नंबरच्या साह्याने लॉगिन करायचे आहे.
- यानंतर अर्ज तपशील या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांचा तपशील दिसेल.
- यामध्येच शेवटी रक्कम भरण्याचा पर्याय दिसेल.
- यानंतर स्वयं सर्वेक्षण असा पर्याय दाखवला जाईल.
- ज्या शेतकऱ्यांना हा पर्याय दिसेल त्या शेतकऱ्यांनी सात दिवसाच्या आत पुढील प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- जर ही प्रक्रिया तुम्ही सात दिवसाच्या आत पूर्ण नाही केली तर तुमचा अर्ज बाद केला जाण्याची शक्यता आहे.
- या योजनेतून तुम्हाला कायमचे वगळण्यात येणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा