शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! या शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखापर्यंत कर्ज, पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

KCC Loan Apply: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंत पीक कर्ज कसे मिळेल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या कर्जला शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदर द्यावा लागणार आहे. हे कर्ज कसे मिळवायचे याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया. शेतकऱ्यांना शेती करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. त्यात निसर्ग साथ देत नाही, कधी अवकाळी पावसाचा त्रास तर कधी दुष्काळ यामुळे शेतकरी खूप अडचणीत येत असतात.

निसर्गाच्या प्रादुर्भाव मुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ बनतो. शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शेतकरी येणाऱ्या हंगामात शेतीची चांगल्या प्रकारे मशागत करू शकतो व चांगले पीक घेऊ शकतो. अनेक बँक बँक खातेदारांना कर्ज उपलब्ध करून देण्यास नकार देतात. अशी बाब लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी अनेक वेगवेगळे योजना राबवले आहेत. त्यातीलच शेतकरी पिक कर्ज योजना ही एक आहे.

यामध्ये शेतकऱ्यांसाठी सहजपणे कर्ज स्वरूपात भांडवल उपलब्ध करण्यात येते. यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. हे कर्ज मिळवण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली आहे. या योजनेची विशेषता म्हणजे कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कर्ज मिळते.

नागरिकांसाठी आनंदाची बातमी..! 1 एप्रिल पासून या 10 कोटी कुटुंबांना गॅस सिलेंडर मिळणार फक्त 600 रुपयांत

किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे? | KCC Loan Apply:

शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेतील कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन अप्लाय करू शकता. संबंधित बँक मॅनेजर सोबत तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड ची चौकशी करावी लागेल. हा अर्ज जमा करताना तुम्हाला काही कागदपत्रे आवश्यक आहेत.

किसान क्रेडिट कार्ड साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • खाचे प्रमाणपत्र
  • बँकेकडून मिळालेला केसरीचा अर्ज
  • पॅन कार्ड
  • जमिनीचा सातबारा
  • आठ-अ

किसान क्रेडिट कार्डवर किती व्याजदर आणि लोन मिळते? तर चार टक्के व्याज दराने तीन लाखापर्यंत कर्ज मिळत आहे. विशेष म्हणजे तीन लाखापर्यंत कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागत नाही. या कर्जासाठी कर्जमाफी पाच वर्ष एवढी ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकरी अडचणीच्या काळात किसान क्रेडिट कार्ड ने जवळच्या बँकेत जाऊन सहजपणे कर्ज काढू शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

x
error: Content is protected !!