राज्यात धो–धो पाऊस होणार का पुन्हा लागणार ब्रेक? या तारखेपासून हवामानात होणार मोठा बदल..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Updates: यंदा मान्सूनने सुरुवातीला चांगलीच धडाकेबाज एन्ट्री केली. २६ मे रोजी मुंबईत आणि त्यानंतर लगेचच गडचिरोलीमार्गे विदर्भात तो दाखल झाला, आणि काही दिवस दमदार पाऊसही झाला. मात्र, त्यानंतर अचानक पावसाने ब्रेक घेतल्याचं चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक भाग पावसाच्या प्रतीक्षेत असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जमिनीची ओल कमी होत चालली आहे, आणि खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेला मध्यम ते जोरदार पाऊस अनेक भागांमध्ये अजूनही पोहोचलेला नाही.

हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! विहीर खोदण्यासाठी आता 5 लाखांपर्यंत अनुदान मिळणार…

हवामान विभागाचा पुढील अंदाज: मान्सून पुन्हा सक्रिय होणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सध्या थांबलेला शेतीसाठीचा गाडा पुन्हा सुरू होण्याची चिन्हं आहेत.

हे पण वाचा| PM किसानचा 20वा हप्ता हुकणार? ‘ही’ 5 कामं केली नसतील तर लगेच करा..

शेतकऱ्यांनो, घाई नको!

मात्र, हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, मान्सून अजून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. त्यामुळे, १५ जूननंतरच चांगल्या वाफशावर पेरणी करावी. आत्ताच घाई करून पेरणी केल्यास पाण्याच्या अभावामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. Weather Updates

सध्या मान्सून खान्देश, नाशिक आणि विदर्भाच्या उत्तर भागात पोहोचू शकलेला नाही, कारण त्या भागात वातावरण अजूनही पोषक झालेले नाही. हवामान अभ्यासकांच्या मते, पुढील चार दिवस किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मृग नक्षत्रात म्हणजेच १३ जूननंतर मान्सून पुन्हा जोर पकडेल आणि उर्वरित महाराष्ट्रातही त्याचा विस्तार होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा| शेतकऱ्यांची चिंता वाढली! मान्सूनची प्रतीक्षा लांबणार, हवामान विभागाचा नवीन अंदाज…

मे महिन्यात विक्रमी पाऊस, जूनमध्ये उष्णतेची लाट: हवामानाची मोठी खेळी!

यावर्षी मे महिन्यात मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली, जी गेल्या १२४ वर्षांतील सर्वांत जास्त होती. १२६.७ मिमी पावसाची नोंद हा एक ऐतिहासिक आकडा ठरला. यावरून हवामानातील अनियमितता आणि बदलत्या निसर्गचक्राची कल्पना येते. एकीकडे पावसाचा विक्रम होतो, तर दुसरीकडे जूनच्या सुरुवातीला विदर्भात ४३ अंश सेल्सिअस तापमान अनुभवायला मिळते, हे नक्कीच चिंतेचं कारण आहे.

नागपूरसारख्या भागात, जिथे मे महिना तुलनेने सौम्य होता, तिथेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात सूर्याने रौद्र रूप धारण केल्याचं चित्र आहे. ९ जून रोजी मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता होती, पण त्यानंतर १० ते १२ जूनदरम्यान या भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उर्वरित २९ जिल्ह्यांमध्ये १२ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचाच अंदाज आहे. एकंदरीत, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. १३ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल अशी आशा आहे, पण शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता योग्य वाफशाची वाट पाहणे महत्त्वाचे आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!