Ladaki Bahin Yojana: राज्यातील लाखो लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर आज पुन्हा एकदा आनंद खुलणार आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर चा हप्ता कधी मिळणार? हा प्रश्न मागील काही दिवसापासून महिलांना पडला होता. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार भाऊबीजेच्या अगोदरच हा हप्ता मिळू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढे येऊन या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर महिलांच्या मनात पुन्हा एकदा असेच एक किरण निर्माण झाले आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमाची संवाद साधला. राज्यातील विविध मुद्द्यावर यावेळी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी पत्रकारांनी लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार हा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीज मिळणार आहे. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील ती कोणत्याही परिस्थितीत बंद होऊन देणार नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील महिलांना गिलासा मिळाला आहे. कारण गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर ऑक्टोबर चा हप्ता कधी मिळणार? मिळणार का नाही? अशा प्रश्नांचा वर्षा होत होता.
प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सर्वांना दिवाळी आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर म्हटले की, दिवाळीचा हा पर्व सर्वांच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि नवीन उमेद घेऊन येवो. बळीराजावर आलेले संकट दूर व्हावे यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस परत यावेत. एकनाथ शिंदे यांच्या या शुभेच्छा मुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात विशेष आनंद पसरला आहे. कारण लाडकी वहिनी योजनेचा हप्ता हा फक्त आर्थिक मदत नसून महिलांच्या आत्मसन्मानाचा विषय आहे. Ladaki Bahin Yojana
आता सर्व महिलांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागले आहे. भाऊबीजेच्या मुहूर्तावर महिलांना पैसे मिळणार का? यापूर्वीही गणित उत्सव दसरा आणि नवरात्रीच्या सणानिमित्त सरकारने महिलांच्या खात्यात लाडके वहिनी योजनेचे पैसे जमा केले आहेत. त्यामुळे यंदाही भाऊबीजेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही शिंदेंनी लवकरच मिळणार असे स्पष्टपणे सांगितल्याने बहुतेक हा हप्ता पुढील काही दिवसात महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.
या योजनेमुळे राज्यातील असंख्य गोरगरीब कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळत आहे. दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत अनेक महिलांच्या खर्चात मोलाची भूमिका बजावत आहे. काहींनी या पैशातून छोटा मोठा व्यवसाय देखील सुरू केला आहे. तर काही महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी या पैशाचा उपयोग केला आहे. लाडकी बहीण योजना ही केवळ योजना नाही तर घरोघरी आनंद उत्साह साजरा करणाऱ्या भावना निर्माण करणारी योजना बनली आहे. भाऊबीज हा भाऊ आणि बहिणींच्या प्रेमाचा सण आहे. या सणानिमित्त प्रत्येक भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देत असतो. या सणानिमित्त जर लाडक्या बहिणींना सरकारकडून भेटवस्तू मिळाली तर महिलांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद दिसेल.

1 thought on “Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार! या दिवशी मिळणार ऑक्टोबरचा हप्ता? एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी अपडेट”