Pm Kisan Yojana 21th Hapta News | देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे, जर तुम्ही देखील पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा कारण ही बातमी तुमच्या कामाची बातमी ठरणार आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच Pm किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे. परंतु काही निवडक शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. Pm Kisan Yojana 21th Hapta News
सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा काळ कोसळलेला आहे. अशातच ही बातमी शेतकऱ्यांना चिंताजनक ठरणार आहे. मध्यंतरी अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण पिक वाया गेले, कुठे कोणाची गुरं गेले, काही शेतकऱ्यांची घर देखील राहिले नाही. काही ठिकाणी काहीच उरलं नाही अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून कुठेतरी थोडी मिळणारी मदत ही शेतकऱ्यांसाठी आधार बनते. आता लवकरच शेतकऱ्यांना दिवाळीनंतर 21 वा हप्ता मिळणार आहे, परंतु यावेळी मात्र काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांना मुकावा लागणार आणि त्यांचे लाभार्थी यादी मधून नाव वगळण्यात येणार अशी शक्यता आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय?

देशभरातील शेतकऱ्यांना थोडासा हातभार लावण्यासाठी या योजनेअंतर्गत वर्षातून तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत २० हप्ते शेतकऱ्यांना दिलेले आहेत. आता सगळ्यांच्या नजरा 21 व्या हप्त्याकडे लागलेला आहे, पण यावेळी सरकारने स्पष्ट केला आहे की पात्र आणि पडताळणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच रक्कम दिली जाईल.
गेल्या काही महिन्यात अनेक ठिकाणी चुकीच्या कागदपत्रांवर अर्ज झालेले दिसून आले. काही शेतकरी अपात्र असून देखील नाव घालून लाभ घेतल्याच आढळे. त्यामुळे विभागाने अशा अर्जांची चौकशी करून रद्द करण्यास सुरुवात केली आहे. जर कोणी पातळ नसून पैसे घेतले असतील, तर ते पैसे परत वसूल केले जाऊ शकतात.
या योजनेचा पुढील हप्ता थांबू नये म्हणून शेतकऱ्यांनी दोन महत्त्वाची कामे तातडीने करावीत E KYC आणि जमीन पडताळणी. E KYC म्हणजे शेतकऱ्यांचा आधार आणि बँक खाते योग्यरीत्या जोडले आहे का हे तपासले जातात. त्यामुळे पैसे योग्य खात्यामध्ये जातात आणि फसवणुकीपासून टाळता येते. तर जमीन पडताळणी शेतकऱ्यांची जमीन खरी, लागवड योग्य आणि त्यांच्याच नावावर आहे का हे निश्चित केल जात.
अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया अद्या पूर्ण केलेली नाही. त्यामुळे सरकारने सूचित केलं की ज्यांची पडताळणी प्रलंबित आहे, त्यांचा पुढील हप्ता थांबवला जाईल. म्हणजेच, पैसे त्यांच्या खात्यात थेट येणार नाहीत. आता 21 वा हफ्ता दिवाळीनंतरच येईल असं सांगण्यात आले. नंबरच्या पहिल्या किंवा दुसरी आठवड्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही अफेवरती विश्वास ठेवू नये.
हे पण वाचा | शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळणार का? पहा सविस्तर..
