Namo Shetkari Yojana: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील करोडो शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देखील राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी बिहार मधील एका कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकार नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सव्वा हप्ता एक मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही तारीख समोर आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Namo Shetkari Yojana
हे पण वाचा | शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाशिम जिल्ह्यातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अकरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता 9.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसोबत पीएम किसान योजनेचा हप्ता देखील मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने 2013 पासून नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेतून आतापर्यंत पाच हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात केली आहे. पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र ठरत आहेत. राज्यात पीएम किसान योजनेसाठी 91 लाख शेतकरी पात्र आहेत. त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी देखील तेवढेच शेतकरी पात्र आहेत.
हे पण वाचा :– शेतकरी कर्ज माफी संदर्भास मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली मोठी स्पष्टीकरण
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने वेगवेगळ्या योजना राबवल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना मिळून लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेतून प्रतिमा 1500 रुपये ऐवजी फक्त 500 रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या दोन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्या आहेत.
दरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 1978 चा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना इ केवायसी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया केली नाही तर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावा लागेल. या दोन्ही योजनेचे पैसे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
3 thoughts on “शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळणार का? पहा सविस्तर..”