Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी जुलै 2024 मध्ये एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महिलांसाठी खूप महत्त्वाची आणि नामांकित ठरली आहे. एवढेच नाही तर या योजनेच्या जीवावरती पुन्हा महायुतीने सरकार स्थापन केलेले आहे. यामुळे ही योजना सध्या खूप चर्चेत आलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ दिला जातो. आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती 15 हप्ते जमा करण्यात आलेल्या आहेत परंतु अद्याप ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही जवळपास नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे. Ladki Bahin Yojana
परंतु दरम्यान याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. खरंतर, या योजनेचे आतापर्यंत एकूण 15 हप्ते देण्यात आलेले आहेत. पण ही राज्यातील सर्वात चर्चेत राहिलेले आणि टीका असणारी योजना ठरली आहे. या योजनेबाबत सातत्याने कुठे ना कुठे घडामोडी समोर येत आहेत. कधी विरोधक टीका करतात तर कधी सत्याधारी असा सामना पाहायला मिळतो.
सध्या ही योजना एक सरकारची डोकेदुखी ठरत आहे. कारण या योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्याने सरकारला त्याची मोठी तडजोड करावी लागत आहे यामुळे राज्य शासनाच्या तिजोरी वरती आर्थिक ताण पडत आहे. तर यामध्ये काही गैरप्रकार घडल्याचे देखील समोर आलेले आहे काही पुरुषांनी लाभ घेतला तर काहींनी चुकीचे डॉक्युमेंट देऊन लाभ घेतलेला आहे परंतु शासनाने यांच्या वरती तर कारवाई सुरू केलेली आहे.
लाभार्थी महिलांना ऑक्टोबरचा हप्ता 4 नोव्हेंबर 2025 पासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल अशी माहिती राज्याच्या मंत्री अदिती तटकरे त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरती याबाबत अधिकृत माहिती दिलेली आहे याचा हप्ता पुढील दोन-तीन दिवसात महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल.
म्हणजे आता चार नोव्हेंबर पासून महिलांच्या खात्यात हप्ता जमा सुरुवात होईल परंतु त्यापूर्वी नोव्हेंबरचा हप्ता देखील महिलांच्या खात्यावरती जमा होईल असा दावा केला होता परंतु सरकारने फक्त ऑक्टोबरचा हप्ता इतरही करण्यास मंजूर दिलेले आहे आता महिलांना पुढचा हप्ता मिळतो का नाही हे पाहण्यासारखे राहणार आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..