Cibil Score: चेक बाउन्स झाला तर CIBIL स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या खरी सत्य परिस्थिती..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CIBIL Score: आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की जर चेक बाउन्स झाला तर माझा सिविल स्कोर कमी होईल का? कारण आजकालच्या काळात CIBIL स्कोअर चांगला ठेवण खूप महत्त्वाचे आहे. एखाद्या बँकेकडून कर्ज घ्यायचे असो किंवा क्रेडिट कार्ड मिळवायचे असो सर्वांसाठी पहिला निकष म्हणजे तुमच्याकडे सिबिल स्कोअर किती आहे? आपण या लेखांमध्ये आज चेक बाउन्स झाला तर CIBIL स्कोअर कमी होतो का? सिबिल स्कोअर कशामुळे घसरतो? सिबिल स्कोअर कसा वाढवावा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

CIBIL स्कोअर म्हणजे काय?

सर्वप्रथम सिबिल स्कोअर म्हणजे काय हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सिबिल स्कोअर हा 300 ते 900 दरम्यान असणारा एक आकडा असतो. हा आकडा तुमच्या परत पिढीच्या शिस्तीबद्दल मीटर दाखवतो. समजा 750 किंवा त्यापेक्षा अधिक CIBIL असेल तर बँक तुम्हाला कमी व्याजदरात लवकर कर्ज देते. कारण तुम्ही ते कर्ज वेळेत माघारी फेडू शकते असे बँकांना वाटते. त्याचबरोबर 650 च्या खाली CIBIL गेल्यास कर्ज मिळण्यास अडचण निर्माण होते. अशावेळी कर्ज मंजुरीला विलंब होतो व्याजदर जास्त असतो आणि आर्थिक विश्वास कमी होतो. म्हणूनच CIBIL स्कोअर चांगला ठेवणे खूप गरजेचे आहे.

CIBIL Score
CIBIL Score

चेक बाउन्स म्हणजे काय आणि काय घडतं?

चेक बाउन्स म्हणजे दिलेला चेक बँकेकडून क्लिअर न होणे. असं घडण्याची काही कारणे खालील प्रमाणे आहेत. बँक खात्यात पुरेसा बॅलन्स नसणे, सही जुळत नसणे, चुकीची तारीख लिहिणे, आकडे आणि शब्दात रकमेचा फरक असणे, चेक एक्सपायर किंवा ओव्हर राईट झालेला असणे, खाते होल्ड किंवा बंद असणे या कारणांमुळे तुमचा चेक बाउन्स होऊ शकतो. तर कधी कधी बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे देखील चेक बाउन्स होऊ शकतो. मात्र याची थेट नोंद cibil कडे जात नाही त्यामुळे फक्त चेक बंद झाल्याने तुमचा CIBIL स्कोअर कमी होत नाही.

सिबिल स्कोअर कशामुळे कमी होतो?

जर चेक बाउन्स मुळे तुमचा ईएमआय, कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरले गेले नाही. तर बँक ही माहिती CIBIL कडे पाठवते. आणि या ठिकाणी तुमचा CIBIL Score कमी होऊ शकतो. समजा तुम्ही एखादी गाडी हप्त्यावर घेतली आणि त्याचा हप्ता भरण्यासाठी चेक दिला पण तो चेक बाउन्स झाला. हप्ता वेळेत भरला नाही तर त्याची CIBIL कडे नोंद केली जाते. यामुळे तुमचा स्कोर कमी होऊ शकतो. मात्र हे फक्त एकदाच घडले असेल तर मोठा इफेक्ट होत नाही. मात्र वारंवार असं घडत असेल तर तुमचा CIBIL स्कोअर झपाट्याने कमी होऊ शकतो आणि बँकेचा तुमच्यावरील विश्वास देखील संपू शकतो.

चेक बाउन्स होऊ नये त्यासाठी काय करावे?

  • खात्यात पुरेसा बॅलन्स ठेवा. थोडा जास्त ठेवणे नेहमीच सुरक्षित असते.
  • सही नीट तपासा, सही चेंज केली असेल तर लगेच बँकेला अपडेट करा.
  • रक्कम शब्दात आणि आकड्यात एकसारखी भरा.
  • ओव्हर रायटिंग टाळा अशाच एक वर बँक व्यवहार करणे टाळते.
  • तारीख आणि पोस्ट डेट नीट चेक करून तपासा.
  • चेक बाउन्स झाल्यास घाबरू नका लगेच संबंधित व्यक्तीशी आणि बँकेची संपर्क साधा व त्वरित पेमेंट पूर्ण करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!