Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ऑक्टोबर महिना संपून काही दिवस उलटले आहेत. पूर्ण महिनाभर लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याचा आपला कधी मिळणार याची वाट पाहत होत्या. अखेर सरकारकडून ऑक्टोबर महिन्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स वर ट्विट करून ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपासून लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील महिला किंवा शहरी भागातील महिला मागील काही दिवसांपासून ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. कारण सप्टेंबर चा हप्ता वेळेत मिळाल्यानंतर ऑक्टोबर चा हप्ता कधी मिळणार हाच प्रश्न त्यांना पडला होता. मंत्री अतिथी तटकरे यांच्या अधिकृत घोषणेमुळे महिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद दरवळू लागला आहे. आदिती तटकरे यांनी एक्स वर लिहिले होते की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात होत आहे. लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये जमा होतील.”
आदिती तटकरे यांनी या योजनेला महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असे देखील म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील गोरगरीब माता-भगिनी या योजनेमुळे यशस्वीरित्या पुढे जात आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जात आहे. मात्र ज्या महिला आधीच नमो शेतकरी आणि पीएम किसान महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे त्यांना दरमहा पाचशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. महाडीबीटी द्वारे या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास आज सुरुवात झाली आहे. तुमच्या खात्यात पैसे आले का नाहीत हे तुम्ही बँकेत जाऊन किंवा नेट बँकिंगचा वापर करून तपासू शकतात.
लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती. ही योजना मुळात मध्यप्रदेश मधील लाडली बहना योजनेवर आधारित आहे. सुरुवातीपासूनच या योजनेची प्रचंड चर्चा महाराष्ट्रामध्ये होताना दिसली. अनेक महिलांनी याचे कौतुक केले तर विरोधकांनी यावर जोरदार टीका देखील केली. विरोधकांच्या म्हणण्यानुसार या योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत त्याचबरोबर या योजनेचा गैरवापर देखील करण्यात आला. अगदी काही पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे देखील समोर आले. विरोधकांकडून ही योजना लवकरच बंद होणार आहे असे देखील म्हटले गेले. मात्र राज्य सरकारने स्पष्ट केले की ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. पात्रता निकष कठोर करून या योजनेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी ई केवायसी देखील अनिवार्य करण्यात आली आहे.
eKYC करण्याची अंतिम तारीख
आदिती तटकरे यांनी एका पोस्टमध्ये आणखीन एक महत्त्वाची सूचना दिली आहे. त्या म्हंटल्या आहेत की, “या योजनेतील लाभार्थ्यांसाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर पूर्वी आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.” कारण जर ई केवायसी पूर्ण केली नाही तर पुढील महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारी कर्मचारी आणि ग्रामपंचायत या प्रक्रियेसाठी गर्दी होताना दिसत आहे. Majhi Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत देणारी योजना नसून या योजनेमुळे महिलांच्या आत्मसन्मानाची नवीन ओळख बनली आहे. अनेक गरीब विधवा आणि निराधार महिलांसाठी ही रक्कम छोट्या-मोठ्या गरजा भागवणारी ठरत आहे. या पैशातून महिला आपला दैनंदिन घर खर्च त्याचबरोबर मुलांचे शाळेची फीस औषध उपचाराचा खर्च भागवत आहेत. आजकालच्या काळात महिलांच्या हातात आर्थिक स्वावलंबाच बळ असणं आवश्यक बनला आहे. या योजनेअंतर्गत पुढील दोन-तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्यात हप्ता जमा झालेला असेल. अशावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच असतो.