Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यापासून महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनत आहे. सुरुवातीपासूनच महिलांकडून या योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. लाखो महिलांनी या योजनेत नोंदणी करून दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळवला आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून सुशील मीडियावर आणि राजकीय वर्तुळात या योजनेबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. ही योजना बंद होणार अशा चर्चांना देखील पाठबळ मिळत आहे. मात्र आता या सर्व चर्चेवर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही योजना बंद होणार नसून, कायम सुरूच राहील असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, महिलांसाठी ही योजना केवळ आर्थिक मदत देणारी नाही तर त्यांना आर्थिक दृष्ट्या पाठबळ देणारी योजना आहे. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा कोणताच प्रश्न उपस्थित होत नाही. राज्यातील गोरगरीब महिलांना या योजनेतून मिळणाऱ्या लाभापासून त्यांचे घर चालवण्यास आभार मिळत आहे. त्याचबरोबर अनेक महिला या पैशातून छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे गोरगरीब महिलांच्या आयुष्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
ई–केवायसी करणे अनिवार्य
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असणाऱ्या महिलांसाठी ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून यासाठी 17 नोव्हेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या योजनेत पारदर्शकता निर्माण व्हावी व खऱ्या लाभार्थ्यांची ओळख व्हावी यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला होता. दरम्यान राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की, राज्यात पुराच्या संकटामुळे अनेक महिलांना eKYC करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा महिलांना आणखीन पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल. त्यामुळे ज्यांनी अजून ई केवायसी केली नाही त्यांना थोडा अधिक वेळ मिळू शकतो.
लाडकी बहीण योजना बंद होणार का?
राज्यावर निर्माण झालेले आर्थिक संकट आणि निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर काहीजणांना असं वाटत होतं की सरकार ही योजना बंद करू शकते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्पष्टीकरणानंतर ही योजना बंद होणार नाही हे स्पष्ट होते. महिलांनी महायुतीला निवडणुकीसाठी मोठे समर्थन दिले आहे. त्यांचे योगदान आम्ही विसरणार नाही. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. Ladki Bahin Yojana Scheme
लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाचा आर्थिक लाभ महाडीबीटी द्वारे थेट बँक खात्यात जमा केला जातो. सरकारी कर्मचारी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम महिलांना या योजनेतून वगळण्यात आला असलं तरी पात्र महिलांना अजूनही या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयाचा लाभ दिला जात आहे. मात्र सरकारने दिलेल्या तारखेपर्यंत ज्या महिला ekyc करणार नाहीत त्यांचा लाभ बंद होऊ शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ही योजना बंद होणार अशा अफवांवर विश्वास न ठेवता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा.