Agriculture News | या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाईपोटी 25 लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News | शेती करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असतो. कधी अचानक आलेला अवकाळी पाऊस अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होते हेच नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे तालुक्यातील 550 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत. Agriculture News

ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 25 लाख रुपये मान्यता देण्यात आली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. यासाठी बँक खात्याचे आधार शेडिंग असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आधार बँक खाते लिंक असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.

हे पण वाचा | या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाईपोटी 25 लाख रुपये

मध्यंतरी 2023 नंबर महिन्याच्या शेवटी अचानक झालेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले होते चक्क हातात तोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचे हिरावून गेला होता. याच अवकाळी पावसाने 141 हेक्टर क्षेत्रवरील भात पिकांचे नुकसान झालेले होते. ते नुकसान भरपाई देण्यासाठी तहसीलदार यांनी पंचनामे केली महसूल विभाग कृषी विभाग यांच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी पंचनामे केलेली आहे.

हे पण वाचा | मराठी बातम्या जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

त्यानुसार मुळशी तालुक्यातील सुमारे 550 शेतकरी पात्र ठरलेले आहेत. त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25 लाख रुपयांची रक्कम जमा होणार असून, यासाठी यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी ही रक्कम मिळवण्यासाठी आपल्या बँक खात्याचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असणार आहे. यासाठी बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या तरच ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे.

असे करा बँक खाते लिंक

जर तुम्हाला शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या लाभ मिळवण्यासाठी बँक खाते लिंक करणे आवश्यक असणार आहे जर कसे करणार आहात तुम्ही ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. बँक खाते लिंक करत असताना तुम्हाला लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ओटीपी येईल हा ओटीपी आधार कार्ड प्रमाणे करून करतानाच देण्यात येणार आहे. प्रमाणीकरण झाले असल्यास प्रमाणपत्र देण्यात येईल व नंतर हे नुकसान भरपाई चे पैसे खात्यावरती जमा होणार आहेत. आधार कार्ड प्रमाणेकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळील महा सेवा केंद्र मध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी असे अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आलेले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!