पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे जमा; तुम्हाला मिळाले का नाही? असे चेक करा..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status: केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. या योजनेअंतर्गत 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार या ठिकाणावरून जमा करण्यात आले आहेत. Beneficiary status

पीएम किसान सन्माननिधी योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात 19 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा हा हप्ता जमा करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेत वेगवेगळ्या राज्यातील शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. पी एम किसान सन्मान निधी योजनेत अनेक शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही त्यांना या योजनेचा लाभ दिला गेला नाही. त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी नियमा बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे.

हे पण वाचा | पैसे भरले परंतु अजून मिळेना सौर पंप! पहा नेमकं प्रकरण तरी काय? 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19 व्या हप्त्यासाठी 21 हजार पाचशे कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. पी एम किसान योजनेत सर्वाधिक लाभार्थी हे बिहार राज्यातील शेतकरी आहेत. या योजनेत तुम्हाला दर तीन महिन्यांनी केवायसी करणे आवश्यक असते. केवायसी केली नसेल तर या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत. यावेळी देखील अनेक शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा न झाल्याचे कारण केवायसी आहे. महाराष्ट्र राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला आहे.

हे पण वाचा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! वीज दर होणार इतक्या रुपयांनी कमी

तुमच्या खात्यात 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले का नाही कसे तपासावे?

पी एम किसान योजनेअंतर्गत 19व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का नाही हे तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासू शकता. यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट लॉगिन करावी लागेल. त्यानंतर बेनिफेसरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकून गेट ओटीपी या पर्यावर क्लिक करून आलेला ओटीपी न चुकता त्या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर गेट डाटा या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळाला आहे का नाही हे तुम्ही तपासू शकता. त्याचबरोबर तुम्ही बँकेत जाऊन तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले आहेत का नाही याची खात्री करून घेऊ शकता. जर तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत असाल तर त्यावर देखील तुम्हाला पैसे मिळाले आहेत का नाही याची माहिती मिळेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे जमा; तुम्हाला मिळाले का नाही? असे चेक करा..”

Leave a Comment

error: Content is protected !!