मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! वीज दर होणार इतक्या रुपयांनी कमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

maharashtra electricity bill : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. ही घोषणा सर्व जनतेसाठी महत्त्वाची ठरली आहे. या घोषणेत वीज दरात कपात करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच आता लाईट बिल मध्ये आपल्याला फरक आढळून येईल. तर आपण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊ.maharashtra electricity bill

महाराष्ट्र राज्यातील घरगुती वित ग्राहकांसाठी 100 युनिट पर्यंतचे वीजदर प्रति युनिट 7.65 रुपयावरून 5.87 रुपयापर्यंत म्हणजेच 1 रुपया 78 पैसे पर्यंत कमी करण्यात आलेले आहे. म्हणजेच मित्रांनो असा प्रस्ताव महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठवल्याची माहिती महावितरणचे स्वातंत्र संचालक व भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी शुक्रवारी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे.

या तारखेपासून होणारा नवीन दर लागू :-

1 एप्रिल पासून महावितरणाच्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्या टप्प्या ने मिळू लागतील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सौर ऊर्जा निर्मितीच्या धडाकेबाज कार्यक्रमामुळेच शेतकरी, घरगुती, उद्योगिग ग्राहकांना मोठा फायदा झालेला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे राज्यात आगामी दोन वर्षात 16,000 मेगाव्हेट एवढी सौर ऊर्जा विज निर्मिती होणार आहे त्याचा मोठा फायदा महावितरणला होणार आहे. त्यामुळेच हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे असे ते म्हणाले.

तर औद्योगिक ग्राहकांसाठीचे सर्व सवलत प्रोत्साहन योजना चालू ठेवण्यात येतील तसेच औद्योगिक ग्राहकांना सबसिडी देण्याची गरज पडणार नसल्याचे पाठक यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे अनेक फायदे पुढील पाच वर्षात ग्राहकांना आणि महावितरण कंपनीला होणार आहे महावितरणाचा सरासरी वीज पुरवठ्याचा दर सध्या 9.45 आहे. आणि पुढील पाच वर्षात हे दर देखील पार खाली येतील असेही ते म्हणाले.

1 thought on “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! वीज दर होणार इतक्या रुपयांनी कमी”

Leave a Comment