National Pension Scheme: वाढत्या महागाईमुळे सुरक्षित आणि लाभदाय गुंतवणूक करण्यासाठी अनेक जण चांगल्या योजनेच्या शोधात असतात. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला नफा आणि दीर्घकालीन सुरक्षितता मिळवण्यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम हा एक अतिशय चांगला पर्याय ठरू शकतो. ही एक सरकारची योजना आहे, या योजनेमध्ये फक्त पेन्शन मिळवण्यासाठीच नव्हे तर चांगला परताव मिळवण्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाची ठरू शकते. यामध्ये योग्य नियोजन केल्यास या योजनेतून महिन्याला एक लाख रुपये पेन्शन मिळू शकते तसेच कोट्यावधी रुपयाची बचत देखील होऊ शकते.
नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)
नॅशनल पेन्शन स्कीम ही सरकारने सुरू केलेली एक अतिशय महत्त्वाची बचत योजना आहे. यामध्ये सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचारी गुंतवणूक करू शकतात. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे गुंतवणूकदाराला पेन्शन बरोबरच मोठा परताव देखील मिळतो. नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये नियमित बचती द्वारे आर्थिक स्थिरता निर्माण करता येते आणि कर लाभही मिळतो. ही योजना 18 ते 65 वयातील नागरिकांसाठी आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अतिशय सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे जमा; तुम्हाला मिळाले का नाही? असे चेक करा..
NPS गुंतवणुकीचे नियम व फायदे
नॅशनल पेन्शन स्कीम खाते पोर्टलवर असल्यामुळे कोणत्याही ठिकाणावरून तुम्ही सहजरित्या ऑपरेट करू शकता. योजनेत दोन प्रकारचे खाते उपलब्ध आहेत. टीयर एक आणि टीयर दोन. टीयर एक मध्ये खाते हे दीर्घकालीन निवृत्ती बचतीसाठी आहे. तर टीआर दोन मध्ये खाते बचत खाते म्हणून वापरले जाते. निवृत्तीनंतर 60 टक्के रक्कम एक रकमी वाढवण्याचा पर्याय मिळतो आणि उर्वरित 40 टक्के रक्कम पेन्शनमध्ये गुंतवली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना वरदान आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी करोडो रुपयांची गुंतवणूक करत आहात.
करोडो रुपये कसे मिळवावे?
जर एखाद्या व्यक्तीने 40 वर्षाच्या वयापासून नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तर पुढील २० वर्षांमध्ये त्याला एक लाख रुपये मानसिक पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. यासाठी त्या व्यक्तीला दरमहा वीस हजार रुपये नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये गुंतवी लागतील. दरवर्षी गुंतवणुकीत 10% वाढ आणि दहा टक्के वार्षिक परताव गृहीत धरल्यास वीस वर्षांमध्ये 3.23 कोटी रुपये जमा होऊ शकतात.
या जिल्ह्यातील महिला होणार लखपती! 1 एक लाख 20 हजार महिलांना मिळणार केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ
यामध्ये तुम्ही किती गुंतवणूक केली व किती परताव मिळाला याबद्दल जाणून घेऊया. यामध्ये तुम्हाला एकूण निधी 3.23 कोटी रुपये मिळेल. तुमची मूळ गुंतवणूक 1.37 कोटी रुपये एवढी असेल. एकूण मिळालेला परताव 1.85 कोटी रुपये एवढा असेल. तर बचतीवर लागलेला कर 41.23 लाख रुपये एवढा असेल. National pension scheme
नॅशनल पेन्शन स्कीम ही एक सुरक्षित आणि विश्वासू गुंतवणूक योजना आहे. या योजनेत पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल. सरकारी मान्यता असलेल्या या योजनेत करबचत ही करता येते त्यामुळे ज्या व्यक्तींना निवृत्तीनंतर आर्थिक लाभ हवा आहे आणि मोठा परताव मिळवायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना सर्वोत्तम योजना ठरू शकते. आर्थिक सुरक्षितेच्या दृष्टीने नॅशनल पेन्शन स्कीम ही एक अतिशय चांगली योजना आहे. महिन्याला एक लाख रुपये पेन्शन मिळवण्यासाठी योग्य नियोजन आणि योग्य गुंतवणूक महत्त्वाचे आहे. त्यामुळे आर्थिक फायद्यासाठी आणि सुरक्षित निवृत्ती जीवनासाठी आजच नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
1 thought on “सरकारच्या योजनेतून करोडपती होण्याची संधी! अशाप्रकारे महिन्याला मिळवा 1 लाख रुपये पेन्शन”