आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विमा; किती मिळणार मदत?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance Claim: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरीप हंगाम 2024 अंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून पिक विमा कंपन्यांना आवश्यक शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. 31 मार्च च्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात दिली आहे.

हे पण वाचा | शेतकऱ्यांना होणार फायदा! केंद्रीय कृषिमंत्री यांनी फार्मर आयडी बाबत घेतला मोठा निर्णय

राज्यातील शेतकरी मागील काही दिवसापासून विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावे यासाठी सरकार कार्यरत आहे. विमा कंपन्यांना राज्य सरकारचा हिस्स उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने वित्त विभागाकडून निधी मंजूर करण्यास थोडा उशीर झाला आहे. मात्र आम्ही खात्री देतो की 31 मार्चपूर्वी संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा केली जाईल.

सरकारच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षाने विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. खरीप हंगामातील पिक विमा ऑगस्ट महिन्यात मिळायला हवा होता मात्र राज्य सरकारने विमा कंपन्यांना निधी वेळेत दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्यास प्रतीक्षा करावी लागत आहे. जर सरकारने वेळेत निर्णय घेतला असता तर शेतकऱ्यांना कर्जाचा भार सहन करावा लागला नसता. अशा प्रकारचे टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. Crop Insurance Claim

हे पण वाचा | केंद्र सरकार शेतकऱ्यांना देत आहे 15 हजार रुपये पर्यंत अनुदान! कोणती आहे योजना अर्ज कसा करायचा? 

विमा वितरणातील विलंबाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार विटेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी विमा कंपन्या आणि बँकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विमा कंपन्या मंजूर झालेली रक्कम वेळेवर शेतकऱ्यांना देत नाहीत. बँकांकडून त्यावर व्याज घेतले जाते मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना निधी मिळत नाही. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करावी आणि संबंधित बँकांना जबाबदार धरावे. अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा