राज्यातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता; जाणून घ्या राज्यातील हवामान अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather New Updates: राज्यातील हवामानात मागील काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहे. राज्यात मागील काही दिवसापासून उष्णतेचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यानंतर आता काही भागात थेट पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ढगाच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर चंद्रपूर वर्धा गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे राहण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. Weather New Updates

हे पण वाचा | आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विमा; किती मिळणार मदत?

महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि कोकण गोवा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील आठवड्यात कडाकाचे ऊन पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत पुढील काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या कालावधीमध्ये मुंबईमध्ये किमान तापमानाचा पारा 24 ते 26 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत असू शकतो. तर कमल तापमान पारा 34 ते 36 अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा सहन कराव्या लागू शकतात.

हे पण वाचा | या योजनेअंतर्गत वर्षाला 436 रुपये भरा ! आणि मिळवा 2 लाख रुपयांचा विमा

पुढील पाच दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलका पाऊस आणि ढगांची गडगडाट दिसू शकते. विदर्भातील काही ठिकाणी विजासह वादळ आणि 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वारे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दिवसाचे तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस कमी होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात खानदेशापासून कोल्हापूर आणि सोलापूर पर्यंत दहा जिल्ह्यांमध्ये 18 मार्च ते 20 मार्च दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात 18 ते 21 मार्च दरम्यान आठ जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही 21 आणि 22 मार्च रोजी पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये वातावरण उष्ण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “राज्यातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता; जाणून घ्या राज्यातील हवामान अंदाज”

Leave a Comment